Redmi Note 13 Pro 5G: तुम्हाला कमी किंमतीत २०० मेगापिक्सेल कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर अॅमेझॉनचा लिमिटेड टाइम डील तुमच्यासाठी आहे. या जबरदस्त डीलमध्ये तुम्ही रेडमी नोट १३ प्रो 5G स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे. तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी एचडीएफसी किंवा आयसीआयसीआय बँकेचे कार्ड वापरत असाल तर तुम्हाला ३ हजार रुपयांचा फ्लॅट इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.
कंपनी या फोनवर १ हजार ४०० रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील देत आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत २६ हजार ५९९ रुपयांनी कमी करू शकता. लक्षात ठेवा की, एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी अतिरिक्त सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल.
या फोनमध्ये २७१२x१२२० पिक्सल रिझोल्यूशनसह ६.६७ इंचाचा 1.5K एमोलेड डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्याची पीक ब्राइटनेस लेव्हल १८०० निट्स आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी या फोनमध्ये गोरिल्ला ग्लास व्हिक्टस ऑफर करत आहे. फोनमध्ये १२ जीबीपर्यंत LPDDR4X रॅम आणि ५१२ जीबीपर्यंत यूएफएस २.२ स्टोरेज आहे. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७ एस जेन २ चिपसेट आहे.
फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देत आहे. यामध्ये २०० मेगापिक्सलचा मेन लेन्ससह ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.
फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी ५१०० एमएएचची आहे. ही बॅटरी ६७ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रेडमीचा हा फोन एमआययूआय १४ ओएसवर काम करतो. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. दमदार साउंडसाठी फोनमध्ये डॉल्बी अॅटमॉस देखील मिळेल. अधिक माहिती ग्राहकाने अॅमेझॉनच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी.
संबंधित बातम्या