Amazon Best Deals: अॅमेझॉनच्या किकस्टार्टर डीलमुळे सॅमसंगच्या फोनवर मोठी ऑफर दिली जात आहे. या मोठ्या डीलमध्ये तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी ए३५ 5G ला बेस्ट ऑफर्ससह खरेदी करू शकता. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत ३० हजार ९९९ रुपये आहे. सेलमध्ये हा फोन 5 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटसह खरेदी करू शकता. सर्व बँक कार्डवर ही फ्लॅट सूट दिली जात आहे.
किकस्टार्टर डीलमध्ये फोनवर १ हजार ५५० रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील दिला जात आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत २७ हजार ७५० रुपयांपर्यंत कमी करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे, एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल.
कंपनी या फोनमध्ये २३४०×१०८० पिक्सल रिझोल्यूशनसह ६.६ इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये देण्यात आलेला हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. सॅमसंगचा हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज पर्यायासह येतो. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये माली-जी६८ एमपी५ जीपीयूसह एक्सीनॉस १३८० चिपसेट देत आहे.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यामध्ये ५० मेगापिक्सलचा मेन लेन्ससह ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.
फोनला पॉवर देण्यासाठी यात ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी २५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ओएसबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित सॅमसंग वन यूआय ६.१ वर काम करतो. आयपी ६७ डस्ट आणि वॉटर रेझिस्टंट रेटिंग असलेला हा फोन डॉल्बी अॅटमॉस साऊंडसोबत येतो. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.