Amazon Deals: अॅमेझॉन इंडियावर २७ सप्टेंबरपासून ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलला सुरुवात होत आहे. या सेलपूर्वी अॅमेझॉनने युजर्ससाठी किकस्टार्टर डील्स लाईव्ह केल्या आहेत. या डीलमध्ये स्मार्टफोन्सवर जोरदार डिस्काउंट दिला जात आहे. येथे आम्ही तुम्हाला त्यातील काही उत्तम डील्सबद्दल सांगत आहोत. या डील्समध्ये तुम्ही सॅमसंग, वनप्लस आणि विवोसोबत ओप्पोचा स्मार्टफोन बेस्ट ऑफर्ससह खरेदी करू शकता. विशेष म्हणजे हे फोन तुम्ही आकर्षक एक्सचेंज बोनससोबतही खरेदी करू शकता. लक्षात ठेवा की एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल.
अॅमेझॉनच्या किकस्टार्टर डीलमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए३५ ५जी ३०,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या डीलमध्ये सर्व बँकांच्या कार्डवर ५ हजार रुपयांचा फ्लॅट इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. हा स्मार्टफोन तुम्ही जवळपास १५५० रुपयांच्या कॅशबॅकसह खरेदी करू शकता. एक्स्चेंज ऑफरमध्ये हा फोन २७ हजार ७५० रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या सॅमसंग फोनमध्ये तुम्हाला ६.६ इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे.
८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेला वनप्लस नॉर्ड सीई ३ 5G
सेलमध्ये १७,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. बँक ऑफरमध्ये फोनवर १५०० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या सवलतीसाठी तुम्हाला एसबीआयच्या कार्डने पैसे द्यावे लागतील. किकस्टार्टर डीलमध्ये फोनवर जवळपास ९०० रुपयांचा कॅशबॅकही मिळणार आहे. तसेच फोनवर १६ हजार ३०० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस दिला जात आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह ६.७ इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले मिळेल. फोनचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सेल चा आहे.
विवो व्हाय ५८ 5G
किकस्टार्टर डीलमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजअसलेला हा फोन १८,४९९ रुपयांना उपलब्ध आहे. जर तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी एसबीआय कार्डचा वापर करत असाल तर तुम्हाला १५०० रुपयांची सूट मिळेल. फोनवर ९२५ रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील मिळू शकतो. एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन तुम्हाला १७ हजार ३५० रुपयांमध्ये स्वस्तात मिळू शकतो. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनी फोनमध्ये १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह ६.७२ इंचाचा डिस्प्ले देत आहे. याचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. फोनची बॅटरी ६००० एमएएच ची आहे, जी ४४ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
ओप्पो एफ२७ प्रो+ 5G
३डी कर्व्ड एज असलेला हा फोन सेलमध्ये २९,९९९ रुपयांना मिळत आहे. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनवर १५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील दिला जात आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला २६ हजार २०० रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. फीचरबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे. याचा मुख्य कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा आहे. फोनची बॅटरी ५००० एमएएच ची आहे, जी ६७ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.