Amazon Sale: अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीव्हल सेलला कालपासून सुरुवात झाली. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्तात मिळत आहे. दरम्यान, बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. अॅमेझॉन सेल अंतर्गत ग्राहकांना अवघ्या १२ हजारांच्या आत पाच जबरदस्त फीचर्स असलेले स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहेत.
अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये हे फोन उत्तम बँक ऑफर्स आणि कॅशबॅकसह उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनवर जबरदस्त एक्स्चेंज बोनसही दिला जात आहे. लक्षात ठेवा की. एक्स्चेंजमध्ये मिळणारी सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल.
रेडमी १३ सी 5G च्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये या फोनवर ४५० रुपयांच्या कॅशबॅक मिळत आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये हा फोन ८ हजार ५०० रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनससह खरेदी करू शकता. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये ६.७४ इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन डायमेंसिटी ६१००+ प्रोसेसरवर काम करतो. फोनचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे.
सेलमध्ये लावा ब्लेज ३ 5G (६जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज) हा फोन अवघ्या १० हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. बँक ऑफरमध्ये १ हजार ५०० रुपयांपर्यंत डिस्काउंटसह ऑर्डर करू शकता. फोनवर ५५० रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील दिला जात आहे. ग्राहक हा फोन एक्स्चेंज ऑफरमध्ये १० हजार ४०० रुपयांपर्यंत वाचवू शकतात. कंपनी या फोनमध्ये ६.६ इंचाचा एचडी+ डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये ६ जीबीपर्यंत एक्सटेंडेड रॅम देण्यात आली आहे. यात मीडियाटेक ६३०० प्रोसेसर आहे. फोनमध्ये तुम्हाला ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा मिळेल.
रियलमी नार्झो ७० एक्स 5G चा ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेला व्हेरिएंट १२ हजार ४९८ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये तुम्ही हा फोन १ हजार २५० रुपयांच्या कूपन डिस्काउंटसह खरेदी करू शकता. फोनवर ६२५ रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील दिला जात आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये ११ हजार ८०० रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. रियलमीच्या या फोनमध्ये तुम्हाला १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले मिळेल. फोनचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी ४५ वॅट सुपरवूक चार्जिंगला सपोर्ट करते.
आयक्यू झेड ९ एक्स 5G फोनच्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत १२ हजार ४९९ रुपये आहे. फोनवर ५०० रुपयांचा कूपन डिस्काउंट दिला जात आहे. बँक ऑफरमध्ये या फोनची किंमत १ हजार ५०० रुपयांपर्यंत कमी करू शकता. फोनवर ६२५ रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील दिला जात आहे. हा फोन ११ हजार ८०० रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनससह खरेदी करता येऊ शकतो. हा फोन स्नॅपड्रॅगन ६ जेन १ प्रोसेसरवर काम करतो. यात ६.७२ डिस्प्ले मिळत आहे, जो १२० हर्ट्झपर्यंतच्या रिफ्रेश रेटसह येतो.
सॅमसंग गॅलेक्सी एम १५ 5G जी प्राइम एडिशन हा सॅमसंग फोन अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये १० हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. सेलमध्ये २५० रुपयांच्या कूपन डिस्काउंटसोबत ७५० रुपयांचा बँक डिस्काउंटही दिला जात आहे. कॅशबॅक ऑफरमध्ये तुम्हाला ५५० रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. फोनवर १० हजार ४०० रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस देखील मिळू शकतो. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये तुम्हाला ५० मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. हा फोन डायमेंसिटी ६१००+ चिपसेटवर काम करतो.