जर तुम्हाला वनप्लसचा फोन घ्यायचा असेल तर अॅमेझॉनचा ब्लॅक फ्रायडे सेल तुमच्यासाठी आहे. २ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही वनप्लस नॉर्ड ४ 5G ला दमदार डीलमध्ये खरेदी करू शकतात. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. या सेलमध्ये तुम्हाला हा फोन १,००० रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह मिळू शकतो. कंपनी या फोनवर १ हजार ५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील देत आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत २७ हजार ६०० रुपयांपर्यंत कमी करू शकता. लक्षात ठेवा एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट तुमच्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल.
कंपनी या फोनमध्ये ६.७४ इंचाचा एमोलेड डिस्प्ले देत आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ आणि पीक ब्राइटनेस लेव्हल २१५० निट्स आहे.
वनप्लस नॉर्ड ४ 5G मध्ये १२ जीबीपर्यंत एलपीडीडीआर ५ एक्स रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज पर्याय आहेत. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7+जेन 3 ऑफर करत आहे. फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
या फोनमध्ये ५० मेगापिक्सलच्या मुख्य लेन्ससह ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटमध्ये कंपनी सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देत आहे.
हा फोन अनेक जबरदस्त एआय फीचर्सने सुसज्ज आहे. या फोनमध्ये तुम्हाला ५००० एमएएचची बॅटरी पाहायला मिळणार आहे. फोनमध्ये दिलेली ही बॅटरी १०० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. वनप्लसचा हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित ऑक्सिजनओएस १४.१ सोबत येतो. यामध्ये कंपनी बायोमेट्रिक सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देत आहे.
अॅमेझॉनवर सुरू असलेल्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर भरघोस सूट मिळत आहे. हा सेल मर्यादीत कालावधीसाठी उपलब्ध आहे. या सेलमध्ये आयफोन, सॅमसंग, शाओमी, वनप्लस कंपनीचे स्मार्टफोन अगदी स्वस्तात मिळत आहेत. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी अॅमेझॉनच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.