जर तुम्ही स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा स्मार्ट वॉच घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लेटफॉर्म Amazon कडून २०२४ या वर्षातील पहिल्या मोठ्या फेस्टिव सेलची घोषणा करण्यात आली आहे. अमेझॉनचा Great Republic Day Sale सुरू होणार असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रॉडक्ट रेंजवर मोठा डिस्काउंट दिला जाईल.
प्रजासत्ताक दिनाच्या आधी ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट, ऑडियो प्रॉडक्ट्स तसेच अन्य कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स खूपच कमी किंमतीत उपलब्ध होणार आहेत.
ई-कॉमर्स प्लेटफॉर्मने आपल्या Amazon Great Republic Day Sale ला त्यांच्या वेबसाइटवर टीज करणे सुरू केले आहे. मात्र हा सेल कधीपासून सुरू होणार याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मागच्या वर्षी हा सेल १५ जानेवारीपासून सुरू झाला होता. यावर्षीच्या यादरम्यानच सेल सुरू होऊ शकतो. दरवेळेप्रमाणे अमेझॉन प्राइम सब्सक्राइबर्स या सेलचा लाभ आधी घेऊ शकतात.
४० टक्के कमी किंमतीत स्मार्टफोन्स -
या सेलमध्ये यूजर्सना स्मार्टफोन्स व अन्य एक्सेसरीजवर ४० टक्के फ्लॅट डिस्काउंट दिला जाईल. सेलमध्ये 5G स्मार्टफोन्सची रेंज ९,९९९ रुपयांपासून सुरू होत आहे. त्याचबरोबर डिस्काउंटसह ५०,००० रुपयापर्यंतचे प्रीमियम 5G डिव्हायसेज मिळतील. सेलच्या लँडिंग पेजवर सांगितले गेले आहे की, काही निवडक बँक कार्ड्सवर अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा मिळेल.
लॅपटॉप-स्मार्टवॉचवर तब्बल ७५ टक्केपर्यंतची सूट-
Great Republic Day Sale मध्ये अमेझॉनवर ग्राहक लॅपटॉप तसेच स्मार्ट व्हियरेबल्स ७५ टक्के सवलतीच्या दरात खरेदी करू शकतात. त्याचबरोबर स्मार्ट टीव्ही आणि अन्य होम अप्लायन्सेस ६५ टक्के डिस्काउंटवर खरेदी केले जाऊ शकतात. SBI बँक क्रेडिट कार्ड धारकांना १० टक्के तत्काळ डिस्काउंटचा लाभ मिळू शकतो.
संबंधित बातम्या