मराठी बातम्या  /  बिझनेस  /  HDFC bank fraud : हॅकर्सच्या निशाण्यावर आता HDFC चे ग्राहक, लिंकवर क्लिक केले तर होईल खाते साफ

HDFC bank fraud : हॅकर्सच्या निशाण्यावर आता HDFC चे ग्राहक, लिंकवर क्लिक केले तर होईल खाते साफ

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 02, 2023 07:21 PM IST

HDFC bank fraud : सायबर फ्राॅडची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे सतर्कता बाळगणे प्रत्येकालाच महत्त्वाचे झाले आहे. नाहीतर एक चूकीचे क्लिक तुम्हाला कंगाल करु शकते.सध्या सायबर हॅकर्सच्या निशाण्यावर एचडीएफसीचे ग्राहक आहेत.

fishing msg HT
fishing msg HT

HDFC bank fraud : सायबर फ्राॅडची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. नाहीतर एक क्लिकमुळे तुमच्या आयुष्यभराच्या कमाईचे नुकसान होईल आणि तुम्ही कंगालही होऊ शकतात. सायबर सेलमध्ये दररोज बँकिंग अथवा डिजिटल पेमेंट फ्राॅडशी निगडित अनेक प्रकरणांची नोंद होते. स्टॅटेस्टिकाच्या अहवालानुसार, २०२१ मध्ये संपूर्ण भारतात आॅनलाईन बँकिंग फ्राॅडच्या प्रकरणांमध्ये ४,८ हजार पेक्षा अधिक प्रकरणे समोर आली आहेत.

आता एचडीएफसीचे ग्राहक या हॅकर्सच्या रडारावर आहेत. त्यामुळे जर तुम्ही एचडीएफसीचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

स्कॅमर्स अनेक प्रकारे पैसे चोरू शकतात. पण त्यातही फिशिंग एसएमएस या प्रकाराने स्कॅमर्स लोकांची फसवणूक करतात. फिशिंग बँक एसएमएस द्वारे बँक खाते सस्पेंड झाले आहे. ते पुन्हा चालू करण्यासाठी एसएमएसमध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करुन ईकेवायसी अथवा पॅनकार्ड अपडेट कऱण्यास सांगितले जाते. या प्रकारात एखाद्या व्यक्तीने या एसएमएसवर क्लिक करुन लिक ओपन केल्यास त्याचा फोन हॅक होतो आणि त्याच्या खात्यातील सर्व पैसे गायब होतात.

नुकतेच एचडीएफसीने आपल्या ग्राहकांना अशा फिशिंग एसएमएससंदर्भात अलर्ट केले आहे. तर काही यूजर्सनी बँकेलाच टॅग करुन अशा प्रकारच्या एसएमएसची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी फिशिंग एसएमएसबद्दल माहिती दिली आहे.

HDFC Fraud msg HT
HDFC Fraud msg HT

ट्विटरवर एका यूजर्सने शेअर केलेल्या फिशिंग एसएमएसमध्ये लिहिले आहे की, एचडीएफसी ग्राहक तुमचे नेट बँकिंग आज सस्पेंड होणार आहे. कृपया तुमचे पॅन कार्ड अपडेट करा. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. दुसऱ्या यूजर्सने या ट्विटला उत्तर दिले आहे. त्यात एक एसएमएस शेअर केला आहे. त्यात केवायसी अपडेट करण्यास सांगितले आहे.

Reply of HDFC bank on fraud msg HT
Reply of HDFC bank on fraud msg HT

या गंभीर घटनेची दखल घेऊन एचडीएफसीने उत्तर दिले आहे. असा कोणत्याही प्रकारचा एसएमएस बँकेने पाठवला नसून ग्राहकांनी उत्तर देऊ नये. ग्राहकांशी संपर्क ठेवण्यासाठी एचडीएफसी बँक त्यांच्या संकेतस्थळावरुनच संपर्कात राहते असा अधिकृत मेसेज बँकेने ट्विट केला आहे.

WhatsApp channel

विभाग