Akshaya Tritiya 2025:: अक्षय्य तृतीया हा हिंदू कॅलेंडरमधील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. या दिवशी केलेले कोणतेही चांगले काम किंवा गुंतवणूक समृद्धी आणि यश मिळवून देते असे मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे. हा प्रसंग आणखी खास करण्यासाठी मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ फायनान्सने एक शानदार ऑफर जाहीर केली आहे. वास्तविक, कंपनीने 'जिओ गोल्ड २४ के डेज' ऑफर ची घोषणा केली आहे. या कालावधीत डिजिटल सोने खरेदी केल्यास २ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सोने मोफत मिळणार आहे. अक्षय्य तृतीयेला डिजिटल सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या जिओफायनान्स आणि मायजिओ अॅपच्या ग्राहकांसाठी ही खास ऑफर आहे. जिओ गोल्ड 24 के डेज ऑफर ग्राहकांसाठी २९ एप्रिल ते ५ मे २०२५ पर्यंत उपलब्ध असेल.
कंपनीने डिजिटल सोन्याची खरेदी अगदी सोपी केली आहे. ९,९९९ रुपयांपर्यंतच्या डिजिटल सोन्याच्या खरेदीवर ग्राहकाला खरेदीमूल्याच्या १ % इतके मोफत सोने मिळेल. तर १० हजार किंवा त्यापेक्षा जास्त खरेदीवर २ टक्क्यांपर्यंत मोफत सोनं मिळणार आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना चेकआऊटवर १ % सोन्यासाठी JIOGOLD1 प्रोमो कोड आणि 2% साठी JIOGOLDAT100 वापरावा लागेल. ही ऑफर ऑफर कालावधीत प्रत्येक वापरकर्त्याला 10 व्यवहारांसाठी वैध असेल.
डिजिटल सोने खरेदीसाठी ग्राहकांना ७२ तास वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतरच मोफत मिळणारे सोने त्यांच्या खात्यात दिसेल. ग्राहकाला जास्तीत जास्त २१,००० रुपयांपर्यंत मोफत सोने मिळू शकते. ही ऑफर केवळ सोन्याच्या एकरकमी खरेदीवर वैध आहे, गोल्ड एसआयपीवर नाही.
संबंधित बातम्या