Mukesh Ambani- उद्योगपती मुकेश अंबानी रात्री २ पर्यंत जागून प्रत्येक ईमेलला उत्तर देतात…
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mukesh Ambani- उद्योगपती मुकेश अंबानी रात्री २ पर्यंत जागून प्रत्येक ईमेलला उत्तर देतात…

Mukesh Ambani- उद्योगपती मुकेश अंबानी रात्री २ पर्यंत जागून प्रत्येक ईमेलला उत्तर देतात…

HT Marathi Desk HT Marathi
Published Mar 04, 2025 04:20 PM IST

रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी दररोज रात्री २ वाजेपर्यंत जागून आलेल्या प्रत्येक ईमेलला उत्तर देतात, अशी माहिती आकाश अंबानी यांनी एका कार्यक्रमात दिली.

उद्योगपती मुकेश अंबानी रात्री २ पर्यंत जागून प्रत्येक ईमेलला उत्तर देतात
उद्योगपती मुकेश अंबानी रात्री २ पर्यंत जागून प्रत्येक ईमेलला उत्तर देतात

रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी यांची नुकतेच ‘मुंबई टेक वीक’मध्ये मुलाखत घेण्यात आली. ड्रीम स्पोर्ट्सचे सीईओ हर्ष जैन यांनी आकाश यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांचे वडील मुकेश अंबानी यांच्या कार्यशैलीवर प्रकाश टाकला. आपले सर्वात मोठे प्रेरणास्थान वडील मुकेश अंबानी हे असून कुटुंबात वाढल्यामुळे आपली मूल्ये आणि महत्त्वाकांक्षा कशा आकाराला आल्या याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

आकाश अंबानी म्हणाले, ‘माझी सर्वात मोठी प्रेरणा, निःसंशयपणे मी ज्या कुटुंबासोबत वाढलो आहोत ते कुटुंब आहे. आम्ही सर्व जण ३२ वर्षांपासून एकाच छताखाली राहतो. माझ्या आईवडिलांकडून नेहमी प्रेरणा मिळालेली आहे.’

मुकेश अंबानी यांचे कामाप्रती समर्पण

आकाश अंबानी यांनी आपल्या वडिलांच्या विलक्षण कार्यशैलीवर प्रकाश टाकला. मुकेश अंबानी इंडस्ट्रीत चार दशकांनंतरही रात्री २ वाजेपर्यंत जागून प्रत्येक ईमेल क्लिअर करतात, अशी माहिती आकाश यांनी दिली. ‘माझ्या वडिलांना पाठवलेला प्रत्येक ईमेल ते आजही क्लिअर करतात. ते रात्री २ वाजेपर्यंत हे काम करतात. ते गेली चार दशके काम करत आहेत. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने आम्हाला प्रेरणा मिळते’ असं आकाश म्हणाले.

नीता अंबानींचा आय फॉर डिटेल्स

आई नीता अंबानी यांच्याबद्दल बोलताना आकाश अंबानी यांनी उत्कटता आणि समर्पणाच्या अनोख्या दृष्टिकोनाची कबुली दिली. 'माझी आई प्रत्येक गोष्टीचा तपशील पाहते. आम्ही सर्वजण टीव्हीवर एक मॅच पाहत असू. परंतु माझ्या आईच्या लक्षात येणारे छोटे-छोटे तपशील अशी गोष्ट आहे ज्यातून आपण प्रेरणा घेऊ शकतो. आणि या सर्व गोष्टींपेक्षा समर्पण हे फार मोठी गोष्ट आहे, असं मला वाटतं. आम्ही तिला सर्व छोट्या छोट्या गोष्टी सांगू शकतो. ही मोठी प्रेरणा आहे. 

१२ तासांच्या कामाच्या दिवसापलीकडे

सकाळी ८ ते संध्याकाळी ५ किंवा संध्याकाळी ५ ते सकाळी ८ या वेळेत काम करणे पसंत कराल का?, असं आकाश अंबानी यांना विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले की, ते १२ तासांपेक्षा जास्त काम करतात. त्यांनी त्यांच्या अतिरिक्त कामाच्या वेळापत्रकाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांची पत्नी श्लोका मेहता हिचे आभार मानले. मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात आकाश अंबानी पत्नी आणि बहीण ईशा अंबानीसोबत सहभागी झाले होते.

Whats_app_banner