IPO News : आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अजाक्स इंजिनीअरिंगचा आयपीओ आजपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. जाणून घेऊया या आयपीओबद्दल सविस्तर…
अजाक्स इंजिनीअरिंग कंपनीचा आयपीओ १२६९.३५ कोटींचा आहे. ऑफर फॉर सेल अंतर्गत कंपनी आयपीओच्या माध्यमातून २.०२ कोटी शेअर्स जारी करणार आहे. हा मेनबोर्ड आयपीओ आहे. आयपीओ आजपासून १२ पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. आयपीओ शेअरवाटप १३ फेब्रुवारीला होणार आहे.
आयपीओची किंमत ५९९ ते ६२९ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. कंपनीनं एकूण २३ शेअर्सचा एक लॉट बनवला आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांना किमान १४,४६७ रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना प्रति शेअर ५९ रुपयांची सूट दिली आहे. अजाक्स इंजिनीअरिंगची लिस्टिंग बीएसई आणि एनएसईवर प्रस्तावित आहे.
अजाक्स इंजिनीअरिंगनं अँकर गुंतवणूकदारांकडून ३७९.३२ कोटी रुपये गोळा केले होते. अँकर गुंतवणूकदारांसाठी कंपनीचा आयपीओ ७ फेब्रुवारी २०२५ रोजी खुला झाला. आयपीओच्या जास्तीत जास्त ५० टक्के भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव असतो. तर, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान ३५ टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे.
इन्व्हेस्टर्स गेनच्या अहवालानुसार, ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा आयपीओ आज ५२ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. कंपनीचा कमाल जीएमपी ५८ रुपये प्रति शेअर आहे. या स्तरावर कंपनीचा आयपीओ ५ फेब्रुवारीला ट्रेड करत होता. तेव्हापासून जीएमपीमध्ये सातत्यानं चढ-उतार होत आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचा कंपनीत ९३.५० टक्के हिस्सा होता.
संबंधित बातम्या