जर तुम्ही कमी किंमतीत सर्वोत्तम ओटीटी बेनिफिट असलेला प्लान शोधत असाल तर एअरटेलकडे तुमच्यासाठी एक मजबूत पर्याय आहे. आम्ही बोलत आहोत एअरटेलच्या 449 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल. जिओ आणि व्होडाफोन-आयडियाच्या पोर्टफोलिओमध्ये ही ४४९ रुपयांचा प्लान आहे, पण एअरटेल फायद्याच्या बाबतीत इतर दोन कंपन्यांपेक्षा पुढे आहे. एअरटेलच्या या प्लानमध्ये २२ हून अधिक ओटीटी अॅप्सचा फ्री अॅक्सेस मिळतो. याशिवाय कंपनी या प्लानमध्ये अनलिमिटेड 5जी डेटा देखील देत आहे. चला तर मग जाणून घेऊया तिन्ही कंपन्यांच्या प्लॅनमध्ये देण्यात येणाऱ्या फायद्यांविषयी.
एअरटेलचा ४४९ रुपयांचा प्लान :
एअरटेलचा हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. जर तुम्ही एअरटेलच्या 5जी कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात राहत असाल तर तुम्हाला अनलिमिटेड 5जी डेटा देखील मिळेल. प्लानमध्ये कंपनी दररोज १०० फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा देत आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा एअरटेल एक्सट्रीम प्ले प्रीमियमसोबत येतो. यामध्ये तुम्हाला संपूर्ण २८ दिवसांसाठी २२ हून अधिक ओटीटी अॅप्सचा फ्री अॅक्सेस मिळणार आहे.
कंपनीचा हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. हा प्लान बिंज ऑल नाईट बेनिफिटसह येतो. यामध्ये कंपनी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा देत आहे. व्होडाफोन-आयडियाच्या या प्लानमध्ये दररोज १०० फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये १५ ओटीटी अॅप्सचा फ्री अॅक्सेस मिळतो. कंपनी प्लानमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलीट्स देखील देत आहे. डेटा डिलाइट्समध्ये कंपनी दर महा २ जीबीपर्यंत बॅकअप डेटा देत आहे.
जिओचा ४४९ रुपयांचा प्लान:
जिओचा हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये रोज १०० फ्री एसएमएस मिळतात. याशिवाय देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचा फ्री अॅक्सेस मिळतो. कंपनी या प्लानमध्ये जिओ सिनेमा प्रीमियमचे सब्सक्रिप्शन देत नाही.