Airtel Prepaid recharge Plan News : मोबाइल युजर्स नेहमी स्वस्त आणि जास्तीत जास्त फायदे देणाऱ्या प्लानच्या शोधात असतो. अशा शोधक युजर्ससाठी चांगली बातमी आहे. एअरटेलनं युजर्ससाठी स्वस्तात मस्त प्री-पेड प्लान आणला आहे. हा प्लान घेतल्यास युजर्सना अॅमेझॉन प्राइमसह २० हून जास्त ओटीटी अॅप्स तब्बल ५६ दिवस मोफत पाहता येणार आहेत.
एअरटेलचा हा प्री-पेड प्लान अवघ्या ६९९ रुपयांचा आहे. यात तुम्हाला १६८ जीबी डेटा आणि ५६ दिवसांसाठी Amazon प्राइमची मेंबरशिप मिळणार आहे. याशिवाय याच प्लानमध्ये युजर्सना फ्री कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. जाणून घ्या या योजनेची तपशीलवार माहिती.
एअरटेलचा हा प्लान ५६ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये युजर्सना एकूण १६८ जीबी डेटा मिळेल. यातील ३ जीबी डेटा दर दिवशी वापरता येईल. एअरटेलच्या ५जी नेटवर्क क्षेत्रात राहणाऱ्या युजर्सना अमर्यादित ५जी डेटा दिला जात आहे. याशिवाय, देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग आणि १०० मोफत एसएमएस देखील देत आहे.
प्लानच्या घेणाऱ्यांना ५६ दिवसांसाठी Amazon Prime ची मोफत मेंबरशिप दिली जात आहे. इतकंच नव्हे तर या प्लानमध्ये तुम्हाला एअरटेल एक्सस्ट्रीम प्लेचा ॲक्सेस देखील मिळेल. यात २० पेक्षा जास्त ओटीटी ॲप्स येतात. या प्लानमध्ये विंक म्युझिकचा फ्री अॅक्सेस देखील युजर्सना मिळेल.
एअरटेलच्या ६९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना डिस्ने + हॉटस्टारवर तीन महिन्यांचा मोफत ॲक्सेस मिळेल. याशिवाय युजर्सना एअरटेल एक्सस्ट्रीमचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल.
संबंधित बातम्या