airtel data plans: एअरटेलच्या ग्राहकांची चांदी, २६ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणार १.५ जीबी डेटा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  airtel data plans: एअरटेलच्या ग्राहकांची चांदी, २६ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणार १.५ जीबी डेटा

airtel data plans: एअरटेलच्या ग्राहकांची चांदी, २६ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणार १.५ जीबी डेटा

Published Sep 24, 2024 11:05 PM IST

Airtel launches ₹26 recharge plan: भारतातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक नवीन प्रीपेड प्लॅन जोडला आहे. एअरटेलने परवडणारा रिचार्ज प्लान आणला आहे.

एयरटेल ने लॉन्च किया किफायती रिचार्ज प्लान
एयरटेल ने लॉन्च किया किफायती रिचार्ज प्लान

Airtel Plans: भारतातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक नवीन प्रीपेड प्लॅन जोडला आहे. एअरटेलने परवडणारा रिचार्ज प्लान आणला आहे. नव्याने लाँच करण्यात आलेल्या या रिचार्ज प्लॅनमध्ये एअरटेल युजर्संना १.५ जीबी हायस्पीड डेटा मिळतो. जुलैमध्ये किंमती वाढल्यानंतर एअरटेलने एकतर अनेक जुने प्लान बंद केले होते किंवा त्यांच्या किंमती वाढवल्या होत्या. आता एअरटेलने आपल्या लाखो ग्राहकांसाठी २६ रुपयांचा परवडणारा पॅक लॉन्च केला आहे, ज्यात ग्राहकांना १.५ जीबी डेटा मिळणार आहे.

एअरटेलच्या या नव्या रिचार्ज प्लानची किंमत २६ रुपये आहे. या नव्या प्लानमध्ये युजर्संना १.५ जीबी डेटा मिळणार आहे. प्लानची वैधता एक दिवसाची आहे. अशावेळी काही काम करत असताना तुमचा डेटा संपला तर तुम्हाला हवे तेव्हा या प्लानद्वारे रिचार्ज करता येणार आहे. किंमतवाढीपूर्वी कंपनी २२ रुपयांमध्ये डेटा पॅक ऑफर करत होती, ज्यात युजर्संना एक दिवसासाठी १ जीबी डेटा मिळतो.

एअरटेलचा १६१ रुपयांचा प्रीपेड प्लान

एअरटेलचा १६१ रुपयांचा प्रीपेड प्लान ३० दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये ३० दिवसांसाठी १२ जीबी डेटा मिळतो.

एअरटेलचा १८१ रुपयांचा प्रीपेड प्लान

एअरटेलच्या १८१ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये युजर्संना ३० दिवसांची वैधता आणि १५ जीबी डेटा मिळतो. हा प्लान एअरटेल एक्सट्रीम प्लेसोबत ३० दिवसांसाठी येतो, ज्यामध्ये २० पेक्षा जास्त ओटीटी (ओव्हर-द-टॉप) चा फायदा देखील दिला जातो. या प्लानमध्ये तुम्हाला सोनीलिव्ह, लायन्सगेट प्ले, सननेक्स्ट, चौपाल यांचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाणार आहे.

एअरटेलचा ९७९ रुपयांचा प्रीपेड प्लान

एअरटेलच्या या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. याची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये एकूण १६८ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्स दिले जातात. अतिरिक्त बेनिफिट्समध्ये सोनी लिव्ह, लायन्सगेट प्ले, आहा, चौपाल, होईचोई, सननेक्स्ट यासारख्या 22 पेक्षा जास्त ओटीटी अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन समाविष्ट आहे जे २८ दिवसांसाठी वैध आहेत. तसेच या प्लानमध्ये ३ महिन्यांचा अपोलो २४ चा समावेश आहे. ७ सर्कल, फ्री हॅलो ट्यून्स सबस्क्राइब केले जात आहेत.

Whats_app_banner