दररोज २ जीबी डेटा आणि डिस्ने+ हॉटस्टार एकदम फ्री; जाणून घ्या जिओ, एअरटेल, व्हीआयच्या ८४ दिवसांच्या प्लानबद्दल!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  दररोज २ जीबी डेटा आणि डिस्ने+ हॉटस्टार एकदम फ्री; जाणून घ्या जिओ, एअरटेल, व्हीआयच्या ८४ दिवसांच्या प्लानबद्दल!

दररोज २ जीबी डेटा आणि डिस्ने+ हॉटस्टार एकदम फ्री; जाणून घ्या जिओ, एअरटेल, व्हीआयच्या ८४ दिवसांच्या प्लानबद्दल!

Ashwjeet Jagtap HT Marathi
Updated Feb 06, 2025 10:58 PM IST

Disney+ Hotstar Plan Free: एअरटेल आणि जिओच्या ८४ दिवसांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा आणि डिस्ने+ हॉटस्टार एकदम फ्री मिळत आहे.

Disney+ Hotstar
Disney+ Hotstar

Airtel,  Jio Introduced Great Plans: एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन- आयडियाच्या ८४ दिवसांच्या प्लानमध्ये ग्राहकांना अनेक फायदे मिळत आहेत. याशिवाय, या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा आणि डिस्ने+ हॉटस्टारचे मोफत सब्सक्रिप्शन मिळत आहे. 

जिओचा ९४९ रुपयांचा प्लान:

रिलायन्स जिओ युजर्संना ९४९ रुपयांच्या प्लॅनसह रिचार्जवर दररोज २ जीबी डेटा आणि ८४ दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट्स मिळतात. युजर्संना दररोज १०० एसएमएस पाठवता येतील. रिचार्ज केल्यावर डिस्ने+ हॉटस्टार मोबाइल सब्सक्रिप्शन तीन महिन्यांसाठी दिले जात असून जिओ अ‍ॅप्सचा (जिओटीव्ही, जिओसिनेमा, जिओक्लाऊड) अ‍ॅक्सेस मिळतो. पात्र ग्राहकांना अनलिमिटेड ५जी डेटा दिला जात आहे.

एअरटेलचा १०२९ रुपयांचा प्लान:

एअरटेलच्या वापरकर्त्यांना ८४ दिवसांची वैधता, दररोज २ जीबी डेटा आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देणाऱ्या ओटीटी प्लॅनसाठी १०२९ रुपये खर्च करावे लागतील. या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस पाठवण्याचा पर्याय ही देण्यात आला आहे. पात्र ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा देते. या प्लानमध्ये तीन महिन्यांसाठी डिस्ने+ हॉटस्टार मोबाइलचा फायदा मिळतो.

व्होडाफोन आयडियाचा ९९४ रुपयांचा प्लान:

व्होडाफोन आयडिया (व्हीआय) ग्राहकांसाठी असाच प्लान ९९४ रुपयांचा आहे, ज्यात ८४ दिवसांच्या वैधतेसह दररोज २ जीबी डेटा मिळतो. युजर्स सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात आणि दररोज १०० एसएमएस पाठवण्याचा पर्याय दिला जात आहे. यात तीन महिन्यांसाठी डिस्ने+ हॉटस्टार मोबाइलचे कॉम्प्लिमेंटरी सब्सक्रिप्शन मिळत आहे. या प्लानमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलीट सारखे फायदे मिळतात. तसेच दुपारी १२ ते १२ या वेळेत युजर्संना अनलिमिटेड डेटा अ‍ॅक्सेस करण्याचा पर्याय मिळतो.

जिओचा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लान

जिओचा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लान ३४९ रुपयांचा आहे. हा प्लान फक्त एका युजरसाठी आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना ३० जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. प्लानसोबत अनलिमिटेड 5G डेटाही मिळतो. प्लानमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाले तर यात जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊडचे सब्सक्रिप्शन देखील मिळते.

एअरटेलचा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लान

एअरटेलचा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लान ४४९ रुपयांचा आहे. प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, १०० एसएमएस, ५० जीबी डेटा आणि एअरटेल एक्सट्रीम प्ले प्रीमियम सब्सक्रिप्शन मिळते. ब्लू रिबन बॅग कव्हरेज अँड अपोलो २४/७ सर्कलसह अतिरिक्त फायदे आहेत. यात अनलिमिटेड 5जी चाव्या देखील देण्यात आल्या आहेत.

व्होडाफोन आयडियाचा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लान

व्होडाफोन आयडियाचा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लान ४५१ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, ३००० एसएमएस आणि रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५० जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये २०० जीबी डेटा रोलओव्हरची सुविधा ही मिळते.

Ashwjeet Jagtap

TwittereMail

अश्वजीत जगताप हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये सीनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहे. अश्लजीत येथे राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स, टेक्नोलॉजी, ऑटो, व्हायरल न्यूज आणि करिअर संबंधित बातम्या लिहितो. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात एकूण ५ वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी लेटेस्टली- मराठी (डिजिटल), एबीपी माझा (डिजिटल) मध्ये कामाचा अनुभव. अश्वजीतला क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळणे आणि बायोपिक चित्रपट पाहायला आवडतात.

Whats_app_banner