एअरटेल आणि व्हीआयचा धमाकेदार प्लान; डिज्नी+ हॉटस्टार वर्षभर फ्री, ३६५ दिवसांनंतर करावे लागेल रिचार्ज
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  एअरटेल आणि व्हीआयचा धमाकेदार प्लान; डिज्नी+ हॉटस्टार वर्षभर फ्री, ३६५ दिवसांनंतर करावे लागेल रिचार्ज

एअरटेल आणि व्हीआयचा धमाकेदार प्लान; डिज्नी+ हॉटस्टार वर्षभर फ्री, ३६५ दिवसांनंतर करावे लागेल रिचार्ज

Updated Oct 18, 2024 03:35 PM IST

Airtel and Vodafone Idea Plans: एअरटेल आणि व्हीआयच्या या प्लानवर ग्राहकांना डिज्नी+ हॉटस्टार मोफत मिळत आहे.

एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया प्रीपेड प्लान
एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया प्रीपेड प्लान

Disney+ Hotstar free Plans: एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया म्हणजेच व्हीआय युजर्संना एकापेक्षा एक प्लान ऑफर करत आहेत. जर तुम्ही दीर्घ वैधता असलेला प्लान शोधत असाल तर या कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये तुमच्यासाठी काही उत्तम प्लान आहेत. आज आम्ही तुम्हाला या कंपन्यांच्या अशाच एका प्लानबद्दल सांगणार आहोत. या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला दररोज भरपूर डेटाही मिळणार आहे. विशेष म्हणजे या प्लानमध्ये कंपन्या एक वर्षासाठी डिस्ने+ हॉटस्टार मोबाइलचा फ्री अ‍ॅक्सेस देखील देत आहेत.

एअरटेलचा ३ हजार ९९९ रुपयांचा प्लान :
एअरटेलचा हा प्लान ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दररोज २.५ जीबी डेटा मिळणार आहे. एअरटेलच्या 5G कनेक्टिव्हिटी क्षेत्रात राहणाऱ्या युजर्संना अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळणार आहे. या प्लानमध्ये दररोज १०० फ्री एसएमएस आणि देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. प्लानमध्ये तुम्हाला अनेक अतिरिक्त बेनिफिट्सही मिळतील. यामध्ये डिस्ने + हॉटस्टार मोबाइलचा एक वर्षासाठी विनामूल्य अॅक्सेस चा समावेश आहे. कंपनी या प्लानमध्ये युजर्संना एअरटेल एक्सट्रीम अ‍ॅपचा फ्री अ‍ॅक्सेस देखील देत आहे. यात तुम्हाला प्रीमियम सब्सक्रिप्शन मिळणार नाही हे लक्षात ठेवा.

व्होडाफोन-आयडियाचा ३ हजार ६९९ रुपयांचा प्लान:

व्होडाफोन-आयडियाचा हा प्लॅन ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. हा प्लॅन बिंज ऑल नाईट बेनिफिटसोबत येतो, ज्यात रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा मिळतो. या डेटासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारले जात नाही. एअरटेलप्रमाणेच व्होडाफोन-आयडिया देखील या प्लानमध्ये डिस्ने+ हॉटस्टार मोबाइलचे एक वर्षाचे सब्सक्रिप्शन मोफत देत आहे. प्लानमध्ये तुम्हाला वीकेंड डेटा रोलओव्हर बेनिफिट देखील मिळेल. कंपनीचा हा प्लान डेटा डिलाइट्स बेनिफिटसोबत येतो. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला २ जीबीपर्यंत बॅकअप डेटा मोफत मिळणार आहे.

बीएसएनएल 5G सेवा सुरू करण्याच्या तयारीत

द हिंदूमधील वृत्तानुसार, बीएसएनएल आंध्र प्रदेशचे प्रधान महाव्यवस्थापक एल. श्रीनूने अलीकडेच एका पत्रकार परिषदेत सांगितले की, बीएसनएल २०२५ मध्ये संक्रांतीपर्यंत त्यांची 5G सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. कंपनी सध्या 5G च्या रोलआउटला गती देण्यासाठी टॉवर आणि आवश्यक उपकरणांसह पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी वेगाने काम करत आहे. 5G चे रोलआउट त्या भागात केले जाईल, जिथे बीएसएनएलने आधीच 4G सेवा सुरू केली आहे.

Whats_app_banner