Disney+ Hotstar Subscription Free Plans: एअरटेल आणि रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी ८४ दिवसांचा प्रीपेड प्लान आणले आहेत, ज्यात ग्राहकांना तीन महिन्यांसाठी डिस्ने+ हॉटस्टार मोफत सब्सक्रिप्शन मिळत आहे. जिओ आणि एअरटेलचा हा प्लान अनुक्रमे ९४९ आणि ९७९ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसह बरेच काही मिळत आहे.
एअरटेल हा ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलसह दररोज १०० एसएमएस आणि दररोज २ जीबी डेटा म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान एकूण १६८ जीबी डेटा मिळतो. लक्षात ठेवा हा 4G डेटा आहे आणि डेली डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेटस्पीड ६४ केबीपीएस पर्यंत कमी होईल. चांगली बाब म्हणजे, या प्लानचे ग्राहक अनलिमिटेड 5G डेटासाठी पात्र आहेत. अनलिमिटेड 5G डेटा वापरण्यासाठी तुमच्याकडे 5G फोन असणे आवश्यक आहे. याशिवाय, एअरटेलचे 5G नेटवर्क आपल्या भागात असणे आवश्यक आहे. या प्लानमध्ये एअरटेल एक्सट्रीम प्ले प्रीमियम (22 ओटीटी+), स्पॅम कॉल आणि एसएमएस अलर्ट, रिवॉर्ड्स मिनी सब्सक्रिप्शन, अपोलो 24/7 सर्कल आणि फ्री हॅलोट्यून्स सारखे फायदे देखील आहेत.
जिओचा ९७९ रुपयांचा प्रीपेड प्लान देखील ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलसह दररोज १०० एसएमएस आणि डेली २ जीबी डेटा मिळतो, म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान एकूण १६८ जीबी डेटा मिळेल. लक्षात ठेवा हा 4G डेटा आहे आणि डेली डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेटस्पीड ६४ केबीपीएस पर्यंत कमी होईल. चांगली बाब म्हणजे, या प्लानमध्ये ग्राहक अनलिमिटेड 5G डेटासाठी पात्र आहेत. अनलिमिटेड 5G डेटा वापरण्यासाठी तुमच्याकडे 5G फोन असणे आवश्यक आहे आणि जिओचे 5G नेटवर्क आपल्या भागात असणे आवश्यक आहे. या प्लानमध्ये ३ महिन्यांसाठी (म्हणजे ९० दिवस) फ्री डिस्ने प्लस हॉटस्टार (मोबाइल) सब्सक्रिप्शन, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा फ्री अॅक्सेस यासारखे फायदे आहेत. दोन्ही प्लानमध्ये ओटीटी बेनिफिट्सचा समावेश आहे, पण जर तुम्हाला हॉटस्टार कंटेंट पाहण्याची आवड असेल तर तुम्ही ३० रुपयांपेक्षा कमी पैसे देऊन जिओच्या प्लानसोबत ९० दिवसांसाठी डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाइलचे फ्री सब्सक्रिप्शन मिळवू शकता. या प्लानबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहकांनी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
संबंधित बातम्या