Airtel and Jio: एअरटेलने सणासुदीच्या हंगामासाठी तीन नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत, जे केवळ मर्यादित काळासाठी उपलब्ध आहेत. या प्लानमध्ये ओटीटी स्ट्रीमिंग सर्व्हिसेससह विविध फायदे दिले जातात. एअरटेलने स्पष्ट केले आहे की, हे फेस्टिव्ह प्लान ६ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२४ पर्यंत उपलब्ध असतील. सणासुदीच्या काळात ग्राहकांना अधिक सेवा देण्यासाठी एअरटेलने नवीन प्लान लॉन्च केले आहेत. एअरटेलव्यतिरिक्त रिलायन्स जिओने स्वत:चे फेस्टिव्ह रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत.
एअरटेलचा ९७९ रुपयांचा प्लान: या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि एक्स्ट्रिम प्रीमियमवर २२ हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस मिळतो. या प्लानची वैधता ८४ दिवसांची असून २८ दिवसांसाठी १० जीबी डेटा कूपन मिळणार आहे.
एअरटेलचा १,०२९ रुपयांचा प्लान: एअरटेलच्या १,०२९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि डिस्ने+ हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन मिळते. या प्लॅनमध्ये एक्सट्रीम प्रीमियमवर २२ हून अधिक ओटीटी सेवा आणि २८ दिवसांसाठी वैध असलेल्या अतिरिक्त १० जीबी डेटा कूपनचा समावेश आहे.
एअरटेलचा ३,५९९ रुपयांचा प्लान: या प्लानमध्ये ग्राहकांना संपूर्ण वर्षासाठी दररोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. यात एक्सट्रीम प्रीमियमवर २२ हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस आणि २८ दिवसांसाठी वैध १० जीबी डेटा कूपन चा समावेश आहे.
जिओचे फेस्टिव्ह रिचार्ज प्लान ८९९, ९९९ आणि ३ हजार ५९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. ८९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ९० दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा मिळतो. ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये समान दैनंदिन डेटा भत्ता मिळतो परंतु वैधता 98 दिवसांपर्यंत वाढते. ३ हजार ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये संपूर्ण वर्षासाठी दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. या जिओ प्लॅन्समध्ये अनेक अतिरिक्त सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये १० लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी सब्सक्रिप्शन पॅक आणि १७५ रुपयांचे १० जीबी डेटा व्हाउचर २८ दिवसांसाठी वैध असेल. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना तीन महिन्यांचे विनामूल्य झोमॅटो गोल्ड सब्सक्रिप्शन मिळेल, ज्यात विविध रेस्टॉरंट्समध्ये सूट दिली जाईल. जिओ जिओसाठी ५०० रुपयांचे व्हाउचर देखील समाविष्ट करत आहे, जे २ हजार ९९९ रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर रिडीमेबल आहे.