मराठी बातम्या  /  business  /  Air India : एअर इंडियाची अमृतसर ते लंडन गॅटविक पहिली विनाथांबा सेवा सुरु, पहा डिटेल्स
air india HT
air india HT

Air India : एअर इंडियाची अमृतसर ते लंडन गॅटविक पहिली विनाथांबा सेवा सुरु, पहा डिटेल्स

29 March 2023, 17:04 ISTKulkarni Rutuja Sudeep

Air India : एअर इंडियाने आजपासून अमृतसर ते लंडन गॅटविक मार्गावर पहिल्यांदाच विना थांबा सेवा सुरू केली. त्यामुळे एयर इंडिया ही इंग्लंडमधील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या गॅटविक विमानतळावर सेवा देणारी पहिलीच विमानकंपनी ठरली आहे.

Air India : एअर इंडियाने आजपासून अमृतसर ते लंडन गॅटविक मार्गावर पहिल्यांदाच विना थांबा सेवा सुरू केली. त्यामुळे एयर इंडिया ही इंग्लंडमधील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या गॅटविक विमानतळावर सेवा देणारी पहिलीच विमानकंपनी ठरली आहे. गॅटविकला दिली जाणारी सेवा ही कंपनीच्या भारतातील प्रमुख शहरांपासूनची कनेक्टिव्हिटी विस्तारण्याच्या तसेच प्रवाशांना जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध करून देण्याच्या धोरणाचा भाग आहे.

ट्रेंडिंग न्यूज

असे आहे बोईंग ७८७-८ ड्रिमलायनर

पूर्णपणे सपाट होणाऱ्या बेड्ससह १८ बिझनेस क्लास सीट्स आणि २३८ इकॉनॉमी क्लास सीट्सचा समावेश असलेले बोईंग 787-8 ड्रीमलायनर अमृतसर येथून आठवड्यात तीनदा म्हणजेच सोमवार, गुरुवार आणि शनिवारी कार्यरत असेल. अमृतसरपासून सुरू झालेल्या या विमानसेवांशिवाय एयर इंडिया अहमदाबाद, गोवा आणि कोची येथून ९ इतर साप्ताहिक विमानसेवा देणार असून त्यामुळे गॅटविकला जाणाऱ्या साप्ताहिक विमानसेवांची एकूण संख्या १२ पर्यंत जाईल.

एअर इंडियाचे नेटवर्क मजबूत

या नव्या सेवेमुळे एयर इंडियाचे इंग्लंडमधील अस्तित्व, कामकाज आणि नेटवर्क आणखी मजबूत होईल. सध्या कंपनीद्वारे इंग्लंडला ४९ विमानसेवा दिल्या जात असून त्यात लंडनला (हिथ्रो आणि गॅटविक) जाणाऱ्या ४३ विमानसेवा आणि बर्मिंगहॅमला जाणाऱ्या सहा विमानसेवांचा समावेश आहे. एयर इंडियाद्वारे हिथ्रो, लंडन येथे दिल्ली व मुंबईपासून ३१ साप्ताहिक विमानसेवाही सध्या दिल्या जात आहेत.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन म्हणाले, . या विमानसेवांमुळे भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांवरून इंग्लंडला आणि इंग्लंडवरून भारतातील लोकप्रिय स्थळापर्यंत थेट हवाई कनेक्टिव्हिटी प्रस्थापित करण्याची वाढती मागणी पूर्ण होण्यास मदत होईल.’

भारतातून इंग्लड,युरोपात दिल्या जाणाऱ्या सेवा

एकंदरीत एयर इंडियाद्वारे दर आठवड्याला इंग्लंड व युरोपमधील सात महत्त्वाच्या शहरांसाठी ८० विमानसेवा दिल्या जातात. त्याचबरोबर कंपनीने मिलान, व्हिएन्ना आणि कोपनहेगनसारख्या युरोपमधील निवडक ठिकाणच्या विमानसेवा नव्याने सुरू केल्या आहेत. या विमानसेवा एयर इंडियाचे संकेतस्थळ आणि मोबाइल अपवर, अधिकृत ट्रॅव्हल एजंट व बुकिंगच्या इतर माध्यमांतून आरक्षणासाठी उपलब्ध आहेत.

विभाग