Smartwatch on Flipkart : तुमच्याशी चक्क बोलणारे स्मार्टवाॅच खरेदी करा, फक्त २००० रुपयात
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Smartwatch on Flipkart : तुमच्याशी चक्क बोलणारे स्मार्टवाॅच खरेदी करा, फक्त २००० रुपयात

Smartwatch on Flipkart : तुमच्याशी चक्क बोलणारे स्मार्टवाॅच खरेदी करा, फक्त २००० रुपयात

Published Feb 24, 2023 11:20 AM IST

Smartwatch on Flipkart : कमी किंमतीत जास्त फिचर्स असलेले स्मार्टवाॅच खरेदी करण्याचा इरादा असेल तर शाॅपिंग प्लॅटफाॅर्म फ्लिपकार्टला भेट द्या. येथे एआयवर आधारित व्हाॅईस असिस्टंट असलेल्या फायर बाॅल्ट वंडर वाॅच २००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे.

firebolt wonder smartwatch HT
firebolt wonder smartwatch HT

Smartwatch on Flipkart : स्मार्ट वेअरेबलसंदर्भातील तंत्रज्ञानात सतत सुधारणा होत आहेत आणि आधीच्या तुलनेत त्यांच्यासंदर्भातील वस्तू अधिक स्वस्त पण झाले आहेत. आता कमी किंमतीत जास्त फिचर्स असलेले ट्रेंडी स्मार्टवाॅच खरेदी करण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही. आवाजावर चालणारे फायर बोल्ट वंडर स्मार्टवाॅचला ८० टक्क्यांपेक्षा अधिक सवलतीत ते खरेदी करता येणार आहे.

फायर बोल्ट देशातील सर्वात लोकप्रिय स्मार्टवाॅच ब्रँडमध्ये समाविष्ट आहे. त्यात ब्लू टूथ काॅलिंगशिवाय आर्टीफिशिअल असिस्टंटचा सपोर्ट देण्यात आला आहे. याचा अर्थ स्मार्टवाॅचला हात न लावता केवळ बोलण्यातूनच त्याचा कमांड मिळू शकते. जेंव्हा तुम्ही कामात खूप बिझी असतात तेंव्हा अशा प्रकारचे फिचर्स कामी येतात.

बंपर सवलतीत उपलब्ध

या ब्लूटूथ काॅलिंग स्मार्टवाॅचची भारतीय बाजारपेठेतील किंमत अंदाजे ११,९९९ रुपये आहे. पण फ्र्लिपकार्टवर ते तब्बल ८३ टक्के सवलतींसह १९९९ रुपयांत उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डावरुन पेमेंट केल्यावर ५ टक्के कॅशबॅक दिला जात आहे.

फिचर्स आहेत एकापेक्षा एक सरस

स्मार्ट वाॅचमध्ये १.८ इंची एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे.जो २९४*२८६ पिक्सल रिझाॅल्यूशन आणि २.५ डी लॅमिनेशनसह येतो. ब्लू टूथ काॅलिंग फंक्शनसह इनकमिंग काॅल अटेंडही करता येतात. किंबहुना थेट स्मार्टवाॅचवरुन डायल करता येतात. काॅलिंगसाठी बिल्ट इन मायक्रोफोन आणि स्पीकर देण्यात आले आहेत. एआय वाॅईस असिस्टंटसह बोलून कंमां़्स देता येतात. त्याशिवाय इनबिल्ड कॅल्यूलेटर, गेम्ससह अनेक गोष्टींचा समावेश आहे. हे स्मार्टवाॅच पूर्ण चार्ज झाल्यावर ५ दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ मिळेल असा दावा कंपनीने केला आहे.

Whats_app_banner