Adani group : अदानी समूह संकटातून बाहेर, कर्ज देण्याची तीन परदेशी कंपन्यांनी दाखविली तयारी
Adani group : हिडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाला अनेक प्रकारच्या संकटांच्या मालिकेला सामोरे जावे लागले आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी कंपनीने प्रयत्न सुरु केले आहेत. याच उद्देशाने अदानी समुहाने रोड शो चे आयोजन केले होते.
Adani group : हिडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाला अनेक प्रकारच्या संकटांच्या मालिकेला सामोरे जावे लागले आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी कंपनीने प्रयत्न सुरु केले आहेत. याच उद्देशाने अदानी समुहाने रोड शो चे आयोजन केले होते.
ट्रेंडिंग न्यूज
अमेरिकन शाॅर्ट सेलिंग फर्म हिडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाला गेल्या तीन महिन्यात कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागले. गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी कंपनीने आतापर्यंत अनेक प्रकारचे शर्थीचे प्रयत्न केले आहेत. त्याचा परिणाम म्हणून आता तीन बड्या परदेशी कंपन्यांनी अदानी समूहाला कर्ज देण्याची तयारी केली आहे.
या तीन कंपन्यांमध्ये मित्सुबिशी यूएफजे फायनान्शिअल ग्रुप, सुमितोमो मित्सुई बँकिंग, मिजुहो फायनान्शिअल ग्रुप आहे. जपानच्या या तीन बँकांनी अदानी समुहाला आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे.
फायनान्शिअल टाईम्सच्या अहवालानुसार, सँन्ड र्ड चार्टर्ड आणि बार्कलेजसह अनेक कर्जदार कंपन्यांनी अदानी समुहावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. याशिवाय जी क्यू पार्टनर्स पुन्हा एकदा अदानी समुहात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात जीक्यू पार्टनरमध्ये अदानी एंटरप्राईजेस, अदानी ग्रीन एनर्जी,अदानी पोर्ट्स, अदानी टोटल गॅसमध्ये अंदाजे १५,४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
३१ मार्च २०२३ पर्यंत अदानी समुहाचे कर्ज २.२७ ट्रिलियन रुपये होते. यातील ३९ टक्के बाँन्डमध्ये, २९ टक्के आंतरराष्ट्रीय बँकेत आणि ३२ टक्के भारतीय बँक आणि एनबीएफसीतून घेण्यात आले आहे.
संबंधित बातम्या