मराठी बातम्या  /  business  /  Layoffs: ट्विटर, फेसबुक, ॲमेझॉननंतर आता ‘ही’ मोठी कंपनी एका फटक्यात हजार कर्मचाऱ्यांना काढणार
layoff HT
layoff HT

Layoffs: ट्विटर, फेसबुक, ॲमेझॉननंतर आता ‘ही’ मोठी कंपनी एका फटक्यात हजार कर्मचाऱ्यांना काढणार

06 December 2022, 15:41 ISTKulkarni Rutuja Sudeep

layoffs : अॅमेझाॅन, फेसबूकनंतर आता अमेरिकेतील या नामांकित कंपनीनेही कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. यात अंदाजे १००० कर्मचारी कपात होणार असून प्रामुख्याने कंपनीच्या अमेरिकेतील मुख्यालयात केली जाणार आहे. भारतातही या कंपनीचे विस्तारीकरण मोठ्या प्रमाणात आहे.

Pepsico Layoff : अॅमेझाॅनपासून फेसबूकमध्येही मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात झाली आहे.आता या यादीत पेप्सी बनवणाऱ्या पेप्सिको कंपनीचाही समावेश झाला आहे. कंपनी आपल्या उत्तर अमेरिकेतील मुख्यालयातील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची योजना आखली आहे. या कर्मचारी कपातीमुळे कंपनीच्या उत्तर अमेरिकेतील व्यवसायावर विपरित परिणाम होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

वाॅल स्ट्रिट जनरलच्या अहवालानुसार, आँर्गनायझेशनल्स लेव्हलवर आपल्या कंपनीतील सुधारणेसाठी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय़ घेतला आहे. कंपनी ब्रेवरेज बिझनेसमध्ये जास्त कर्मचारी कपात करणार आहे.

५ लाखांपेक्षा अधिक कर्मचारी पेप्सिकोमध्ये काम करतात

पेप्सिको बेवरेज बिझनेसशिवाय डाॅलिटोस, लेज पोटॅटो चिप्स आणि क्विकर ओट्सही बनवते. कंपनीच्या फूड आणि बेवरेज बिझनेसमध्ये जागतिक पातळीवर ३ लाख ९ हजार लोक काम करतात. यात अमेरिकेतच फक्त १.२९ लाख कर्मचारी काम करतात. कंपनीने आपल्या उत्पादनांच्या किंमतीत वाढ करत आहे. कच्चा माल, वाहतूक आणि लेबर काॅस्टच्या किंमतीत वाढ झाली आहे. किंमतीत वाढ झाल्यानंतरही पेप्सिकोचा व्यवयास तेजीत आहे.

दरम्यान, अॅमेझाॅनमध्ये कर्मचारी कपात दुप्पट करण्यात आली आहे. फेसबूकची पालक कंपनी मेटानेही ११ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

विभाग