नुकत्याच सुरू झालेल्या अॅफकॉम होल्डिंग्ज या कंपनीने गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. अवघ्या ३ महिन्यांत अॅफकॉम होल्डिंग्सच्या शेअरच्या किंमतीत ४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बुधवारी बीएसईवर एफकॉम होल्डिंग्सचा शेअर ३ टक्क्यांनी वधारून ५४८.७० रुपयांवर पोहोचला.
अॅफकॉम कंपनीचे शेअर्स ९ ऑगस्ट २०२४ रोजी बाजारात लिस्ट झाले होते. या कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५९०.१५ रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २०५.२० रुपये आहे.
आयपीओमध्ये अॅफकॉम होल्डिंग्सच्या शेअरची किंमत १०८ रुपये होती. कंपनीचा आयपीओ २ ऑगस्ट २०२४ रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आणि ६ ऑगस्टपर्यंत खुला राहिला. ९ ऑगस्ट रोजी कंपनीचा शेअर २०५.२० रुपयांवर लिस्ट झाला होता. लिस्टिंगच्या दिवशी कंपनीचा शेअर तेजीसह २१५.४५ रुपयांवर बंद झाला. इथं कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी अॅफकॉम होल्डिंग्सचा शेअर ५४८.७० रुपयांवर पोहोचला आहे. अॅफकॉम होल्डिंग्सच्या शेअरमध्ये १०८ रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत ४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
अॅफकॉम होल्डिंग्सचा आयपीओ ३०३.०३ पट सब्सक्राइब झाला. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा २०२.८३ पट सब्सक्राइब झाला होता. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) श्रेणीला ६९७.८८ पट, तर आयपीओ पात्र संस्थात्मक खरेदीदार वर्गाला १८६.२३ पट सब्सक्रिप्शन मिळाले. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना केवळ एका लॉटसाठी अर्ज करता आला. आयपीओमध्ये एका लॉटमध्ये १२०० शेअर्स होते. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये १,२९,६०० रुपयांची गुंतवणूक करावी लागली.
अॅफकॉम होल्डिंग्सची स्थापना फेब्रुवारी २०१३ मध्ये झाली. ही कंपनी एअरपोर्ट टू एअरपोर्ट तत्त्वावर कार्गो वाहतूक करण्याचा व्यवसाय करत आहे. भारत, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया, चीन आणि तैवान मध्ये कंपनीचे जनरल सेल्स आणि सर्व्हिस एजंट आहेत.