IPO Listing today : 'या' कंपनीच्या आयपीओनं कमालच केली! पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, तुम्हाला लागलाय का?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO Listing today : 'या' कंपनीच्या आयपीओनं कमालच केली! पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, तुम्हाला लागलाय का?

IPO Listing today : 'या' कंपनीच्या आयपीओनं कमालच केली! पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, तुम्हाला लागलाय का?

Updated Aug 16, 2024 11:23 AM IST

aesthetik engineers ipo listing : शेअर बाजारात एस्थेटिक इंजिनिअर्सची धमाकेदार लिस्टिंग झाली आहे. ९० टक्क्यांच्या प्रीमियमनंतर कंपनीच्या शेअर्सनी वरच्या सर्किटला धडक दिली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.

आईपीओ की धमाकेदार लिस्टिंग हुई है।
आईपीओ की धमाकेदार लिस्टिंग हुई है।

IPO Listing News : एस्थेटिक इंजिनिअर्सने शेअर बाजारात दणदणीत एन्ट्री केली आहे. कंपनीचा आयपीओ आज म्हणजेच १६ ऑगस्ट २०२४ रोजी एनएसई एसएमईवर ९० टक्के प्रीमियमसह ११०.२० रुपयांवर लिस्ट झाला आहे. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. 

आयपीओ गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चांगली बाब म्हणजे कंपनीचा शेअर पहिल्याच दिवशी दुपटीनं वाढूनही तो घेण्यासाठी खरेदीदारांची झुंबड उडाली आहे. त्यामुळं काही वेळातच कंपनीच्या शेअर्सना अप्पर सर्किट लागलं आहे. ५ टक्क्यांच्या तेजीनंतर कंपनीचा शेअर ११५.७० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. अप्पर सर्किट लागल्यानंतर आज व्यवहार बंद झाले आहेत. आता गुंतवणूकदारांना सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आयपीओचा तपशील

कंपनीच्या आयपीओचा आकार २६.४७ कोटी रुपये होता. त्यासाठी ५५ ते ५८ रुपये असा दरपट्टा निश्चित करण्यात आला होता. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीनं ४५.४६ लाख शेअर्स विक्रीला काढले होते. हा संपूर्ण नवीन इश्यू होता. गुंतवणूकदारांना ८ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट या कालावधीत गुंतवणूक करण्याची संधी होती. आयपीओचा लॉट साइज २००० शेअर्स होता. त्यामुळं गुंतवणूकदारांना किमान १ लाख १६ हजार रुपयांचा सट्टा लावावा लागला.

तिसऱ्या दिवशी ७०५ पट सब्सक्राइब झाला होता आयपीओ

बिगर संस्थात्मक गुंतवणूक श्रेणीत (NII) हा आयपीओ १९३३.९६ पट सब्सक्राइब झाला होता. पहिल्या दिवशी २६.४३ पट तर दुसऱ्या दिवशी ५२.२१ पट सब्सक्रिप्शन मिळालं. कंपनीनं अँकर इन्व्हेस्टर्सच्या माध्यमातून ७.५२ कोटी रुपये उभे केले होते. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचा कंपनीत एकूण १०० टक्के हिस्सा होता. हा हिस्सा आता ७३.५० टक्क्यांवर आला आहे.

शेअर बाजाराची आजची स्थिती

जागतिक पातळीवरील सकारात्मक घडामोडींमुळं शेअर बाजार आज आश्वासक वाटचाल करत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही वधारले आहेत. ११.१५ वाजता सेन्सेक्स ३०० हून अधिक अंकांनी वधारला आहे तर, निफ्टी ९० अंकांनी वधारून ट्रेड करत आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांचा आठवड्याचा शेवट गोड झाल्याचं दिसत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर चांगले वाढले आहेत. टेक महिंद्रा, एचसीएल टेक, आयटीसी, इन्फोसिस, रिलायन्स हे शेअरही ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहेत. तर, टायटन, एअरटेल, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स या कंपन्यांचे समभाग घसरले आहेत.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)

Whats_app_banner