मराठी बातम्या  /  बिझनेस  /  adani group stock : अदानीच्या 'या' पावरफुल शेअरनं रचला नवा विक्रम; अवघ्या १५ महिन्यांत तब्बल ३६३ टक्के वाढ

adani group stock : अदानीच्या 'या' पावरफुल शेअरनं रचला नवा विक्रम; अवघ्या १५ महिन्यांत तब्बल ३६३ टक्के वाढ

May 21, 2024 08:03 PM IST

Adani Power share price : हिंडेनबर्गच्या अहवालानंतर संशयाच्या भोवऱ्यात अडकलेला अदानी समूह आता पूर्णपणे बाहेर पडला असून या समूहातील शेअर दिवसेंदिवस नवनवे विक्रम करत आहेत.

अदानीच्या 'या' पावरफुल शेअरनं रचला नवा विक्रम; अवघ्या १५ महिन्यांत ३६३ टक्के वाढ
अदानीच्या 'या' पावरफुल शेअरनं रचला नवा विक्रम; अवघ्या १५ महिन्यांत ३६३ टक्के वाढ

Adani Power share price : अदानी समूहाची कंपनी अदानी पॉवरच्या शेअरनं नवा विक्रम रचला आहे. सुट्टीनंतर सुरू झालेल्या व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी, मंगळवारी अदानी पॉवरच्या शेअरनं मोठी झेप घेतली. अदानी पॉवरचा शेअर आज तब्बल ७ टक्क्यांहून अधिक वाढून ६८०.२५ रुपयांवर बंद झाला. सततच्या तेजीमुळं अदानी पॉवरचं बाजार भांडवल २.६२ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आज, मंगळवारी अदानी पॉवरचा शेअर जरी ६८०.२५ रुपयांवर बंद झाला असला तरी दिवसभराच्या व्यवहारात ६९१.९५ रुपयांच्या उच्चांकाला स्पर्श केला. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २३०.९५ रुपये आहे.

१५ महिन्यांत ३६३ टक्के वाढ

अदानी पॉवरच्या शेअरमध्ये गेल्या १५ महिन्यांत जोरदार वाढ झाली आहे. अदानी ग्रुपच्या पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या १५ महिन्यांत ३६३ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. २४ फेब्रुवारी २०२३ रोजी अदानी पॉवरचे शेअर्स १४६.८० रुपयांवर होते. २१ मे २०२४ रोजी कंपनीचे शेअर्स ६८०.२५ रुपयांवर बंद झाले. शनिवार, १८ मे २०२४ रोजी कंपनीचे शेअर्स ६३४.७५ रुपयांवर बंद झाले. गेल्या एका वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये १७५ टक्के वाढ झाली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स २४८ रुपयांवरून ६८० रुपयांपर्यंत वाढले आहेत.

चार वर्षांत १९६० टक्के वाढ

अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या ४ वर्षांत १९६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अदानी समूहाच्या या कंपनीचे शेअर्स २२ मे २०२० रोजी ३३ रुपयांवर होते. २१ मे २०२४ रोजी अदानी पॉवरचे शेअर्स ६८०.२५ रुपयांवर बंद झाले.

गेल्या ३ वर्षांत, अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये ५७३ टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. २१ मे २०२१ रोजी अदानी पॉवरचे शेअर्स १०१.१५ रुपयांवर होते. २१ मे २०२४ रोजी कंपनीचे शेअर्स ६८०.२५ रुपयांवर बंद झाले. गेल्या सहा महिन्यांत अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये ७६ टक्के वाढ झाली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स ३८६.७५ रुपयांवरून ६८० रुपयांपर्यंत वाढले आहेत.

 

(डिस्क्लेमर : हा लेख कंपनीच्या शेअर बाजारातील कामगिरीवर आधारित आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं इच्छुकांनी आपल्या कर सल्लागाराशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel
विभाग