Q3 Results : अदानी पोर्ट्सचा तिमाही नफा २५१८ कोटींवर, मागील वर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांची वाढ
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Q3 Results : अदानी पोर्ट्सचा तिमाही नफा २५१८ कोटींवर, मागील वर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांची वाढ

Q3 Results : अदानी पोर्ट्सचा तिमाही नफा २५१८ कोटींवर, मागील वर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांची वाढ

Jan 30, 2025 06:09 PM IST

Adani Ports Q3 Results : अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनचा निव्वळ नफा १४ टक्क्यांनी वाढून २५१८.३९ कोटी रुपये झाला आहे.

अदानी पोर्ट्सचा तिमाही नफा २५१८ कोटींवर, मागील वर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांची वाढ
अदानी पोर्ट्सचा तिमाही नफा २५१८ कोटींवर, मागील वर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांची वाढ

Adani Group Companies : अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीचे डिसेंबरच्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले असून कंपनीचा निव्वळ नफा १४ टक्क्यांनी वाढून २५१८.३९ कोटी रुपये झाला आहे. 

मागील आर्थिक वर्ष २०२४ च्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २२०८.२१ कोटी रुपये होता. कंपनीच्या महसुलातही वार्षिक आधारावर मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचा कामकाजातून ७,९६३.५५ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हा आकडा ६९२०.१० कोटी रुपये होता.

डिसेंबर तिमाहीत अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे व्याज, कर, अवमूल्यन आणि अ‍ॅमॉर्टायझेशनपूर्वीचं (EBITDA) उत्पन्न ४,८०२ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या नऊ महिन्यांत अदानी पोर्ट्सचा एबिटा १९ टक्क्यांनी वाढून १४,०१९ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तो ११,८२० कोटी रुपये होता.

मालवाहतुकीत वाढ

अदानी पोर्ट्सची मालवाहतूक आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत ११३ दशलक्ष मेट्रिक टन झाली आहे. मागील वर्षीच्या तिमाहीतील १०९ दशलक्ष मेट्रिक टनांच्या तुलनेत ही मालाची वाहतूक ४ टक्क्यांनी वाढली आहे.

शेअरची स्थिती काय?

अदानी पोर्ट्सचा शेअर आज २.०९ टक्क्यांनी घसरून १०७४ रुपयांवर बंद झाला. मागच्या वर्षभरापासून अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्ये सातत्यानं घसरण होत आहे. एका वर्षात हा शेअर ९.५५ टक्क्यांनी घसरला आहे. तर, मागील ६ महिन्यांत हा शेअर ३०.५४ टक्क्क्यांनी घसरला आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner