मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks to buy : टाटा स्टील, NTPC सहित आज हे स्टाॅक्स करतील मालामाल, इंट्रा डेमध्ये लक्ष ठेवा !

Stocks to buy : टाटा स्टील, NTPC सहित आज हे स्टाॅक्स करतील मालामाल, इंट्रा डेमध्ये लक्ष ठेवा !

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 31, 2023 09:08 AM IST

Stocks to buy : रिझर्व्ह बँकेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात जागतिक आर्थिक मंदीच्या काळातही भारत या संधीचा फायदा घेण्यास सज्ज आहे.

stocks to buy HT
stocks to buy HT

Stocks to buy : भारतीय शेअर बाजार मंगळवारी सलग चौथ्या दिवशी तेजीत बंद झाले. जागतिक बाजारपेठा सावधगिरी बाळगत असतानाही भारतीय शेअर बाजाराची घौडदौड वेगाने होत आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह बंद झाले. निफ्टीवर आयटीसीमध्ये सर्वाधिक २.३५ टक्क्यांची वाढ दिसून आली. परिणामी आज इंट्रा डेमध्ये हे स्टाॅक्स अधिक फलदायी ठरण्याची शक्यता आहे.

अदानी पोर्ट्स

अदानी पोर्ट्स आणि सेझ या गौतम अदानी समूहाच्या कंपनीने त्यांच्या एकत्रित निव्वळ नफ्यात ५% वाढ नोंदवली आहे. मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत अदानी पोर्ट्सचा एकत्रित निव्वळ नफा ११५९ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. अदानी पोर्ट्सचा एकत्रित महसूल वार्षिक ४०% वाढून ५,७९७ कोटी रुपये झाला आहे.

मॅनकाईंड फार्मा

मॅनकाइंड फार्माने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने एकत्रित निव्वळ नफ्यात ५०% वाढ नोंदवली आहे. वर्षभराच्या आधारावर मार्च तिमाहीत मॅनकाइंड फार्माचा एकत्रित निव्वळ नफा वाढून २८५ कोटी झाला आहे. ऑपरेशन्सच्या महसुलाच्या बाबतीत १९% ची वाढ नोंदवली गेली आहे आणि ती २०५३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

एचडीएफसी लाईफ

अमेरिकेची जागतिक गुंतवणूक कंपनी अर्बादानने ब्लॉक डीलद्वारे एचडीएफसी लाईफमधील आपला संपूर्ण हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी शेअर्स ब्लॉक डीलद्वारे विकले जातील अशी अपेक्षा आहे.

पतंजली फूड्स

योग गुरु बाबा रामदेव यांच्या कंपनी पतंजली फूड्सने मार्च तिमाहीत स्वतंत्र निव्वळ नफ्यात १३% वाढ नोंदवली आहे आणि ती वाढून २६४ कोटी रुपये झाली आहे. ऑपरेशन्समधील कमाईच्या बाबतीत पतंजली फूड्सने मार्च तिमाहीत १८ टक्के वाढ नोंदवली आहे आणि ती ७८७३ कोटी रुपये झाली आहे.

एसबीआय

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सवर आज लक्ष असेल. कारण आजपासून त्यांच्या शेअर्सचे एक्स-डिव्हिडंड ट्रेडिंग सुरू होणार आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग