Share Market : अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर तेजीत असतानाच कंपनीनं दिली आणखी एक चांगली बातमी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Share Market : अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर तेजीत असतानाच कंपनीनं दिली आणखी एक चांगली बातमी

Share Market : अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर तेजीत असतानाच कंपनीनं दिली आणखी एक चांगली बातमी

Jan 15, 2025 03:03 PM IST

Adani Green Energy Share Price : अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर पुन्हा एकदा तेजीच्या लाटेवर स्वार झाले आहेत. त्यामागे कंपनीनं केलेली एक घोषणा आहे.

अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये तेजी असतानाच कंपनीकडून आली आणखी एक चांगली बातमी
अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये तेजी असतानाच कंपनीकडून आली आणखी एक चांगली बातमी

Share Marekt News : अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर खरेदी करण्याचा सपाटा गुंतवणूकदारांनी लावला असतानाच आज कंपनीकडून आणखी एक चांगली बातमी आली. अदानी ग्रीन एनर्जीची (AGEL) उपकंपनी असलेल्या अदानी रिन्यूएबल एनर्जी फोर्टी-एट लिमिटेडनं गुजरातमधील खावडा प्रकल्पातील ५७.२ मेगावॅट पवन ऊर्जा विभाग सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम शेअरच्या किंमतीवर झाला आहे.

कंपनीनं स्टॉक एक्सचेंजला या संदर्भात माहिती दिली आहे. गुजरातमधील खावडा येथील प्रकल्प सुरू झाल्यामुळं कंपनीची ऑपरेशनल रिन्यूएबल उत्पादन क्षमता ११,६६६.१ मेगावॅट झाली आहे. डिसेंबरमध्ये अदानी ग्रीन एनर्जीनं अदानी ग्रीन एनर्जी सिक्सटी-एट लिमिटेड (एजीई ६८ एल) नावाची एक नवीन पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली.

कंपनीची आर्थिक स्थिती काय?

अदानी ग्रीन एनर्जीनं आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ५१५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ३७१ कोटी रुपयांच्या तुलनेत ३९ टक्क्यांनी अधिक नफा झाला आहे. कंपनीचं एकूण उत्पन्न ३०.४ टक्क्यांनी वाढून ३,३७६ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते २,५८९ कोटी रुपये होतं. मात्र, त्याचा एकूण खर्चही ३१.३ टक्क्यांनी वाढून २,८३७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

मार्केट एक्सपर्ट्स काय म्हणतात?

ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार, अदानी ग्रीनच्या शेअरची सरासरी टार्गेट प्राइस १,९६६ रुपये आहे. सध्याच्या बाजारभावापेक्षा ती ९५ टक्क्यांनी जास्त आहे. शेअरसाठी चार विश्लेषकांनी खरेदीची शिफारस केली आहे. हा शेअर २० दिवस, ३० दिवस, ५० दिवस, १०० दिवस, १५० दिवस आणि २०० दिवसांच्या साध्या मूव्हिंग एव्हरेजच्या (एसएमए) खाली ट्रेड करत आहे. अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स गेल्या तीन महिन्यांत ४३ टक्के आणि गेल्या दोन वर्षांत ४७ टक्क्यांनी घसरले आहेत.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner