चार दिवसांत ६० टक्क्यांनी वाढला अदानी समूहातील 'या' कंपनीच्या शेअरचा भाव, तुमच्याकडं आहे का?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  चार दिवसांत ६० टक्क्यांनी वाढला अदानी समूहातील 'या' कंपनीच्या शेअरचा भाव, तुमच्याकडं आहे का?

चार दिवसांत ६० टक्क्यांनी वाढला अदानी समूहातील 'या' कंपनीच्या शेअरचा भाव, तुमच्याकडं आहे का?

Dec 02, 2024 12:14 PM IST

Stock Market Updates : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स तेजीच्या लाटेवर स्वार असून गेल्या अवघ्या ४ दिवसांत त्यात ६० टक्क्यांची वाढ झाली आहे.

अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये वाढ
अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये वाढ (REUTERS)

Adani Green Energy Share Price : अमेरिकेतील न्यायालयानं लाचखोरीचा व फसवणुकीचा ठपका ठेवल्यानंतर घसरलेले अदानी समूहातील कंपन्याचे शेअर पुन्हा सावरले आहेत. अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी आली आहे. हा शेअर मागच्या अवघ्या ४ दिवसांत ६०.६६ टक्क्यांनी वाढला आहे.

आज, सोमवारी सकाळी बीएसईवर अदानी समूहाचा शेअर ९.०९ टक्क्यांनी वधारून १,४४५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. कालांतरानं तो पुन्हा घसरला मात्र आताही तो सकारात्मक ट्रेड करत आहे.

अदानी समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी जुगेशिंदर सिंग यांनी शेअर केलेली नवी माहिती हे अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर वाढण्यामागचं खरं कारण आहे. अदानी समूह डॉलर बाँडचा पुनर्विचार करण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी एप्रिल ते जून दरम्यान हे रोखे येऊ शकतात. समूहातील इतर कंपन्याही वर्षभरात सार्वजनिक रोखे विकण्याचा विचार करू शकतात, असं सूत्रांनी सांगितलं. अमेरिकी अधिकाऱ्यांनी लाचखोरीचा आरोप केल्यानंतर अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडनं आपले ६० कोटी डॉलरचे रोखे काढून घेतले होते.

आरोपांनंतरही अदानींच्या कंपन्यांचं रेटिंग कायम

अलीकडच्या कायदेशीर खटल्यांनंतरही क्रिसिलनं अदानी समूहाच्या कंपन्यांसाठी आपल्या मजबूत रेटिंगमध्ये बदल केलेला नाही. अदानी समूहाकडं पुरेशी तरलता आणि ऑपरेशनल कॅश फ्लो आहे. त्यामुळं मध्यम कालावधीत कंपनीच्या कर्जाच्या परतफेडीवर परिणाम होणार नाही, असं ब्रोकरेज कंपन्यांचं म्हणणं आहे.

हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यापासून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांच्या किमतींवर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. ६ महिन्यांत शेअरचा भाव ३०.७० टक्क्यांनी पडला आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner