Gautam Adani : गौतम अदानींच्या ‘अच्छे दिना’ची पुन्हा सुरुवात, आशियातील दुसऱे अब्जाधीश होण्याचा मिळाला मान
Gautam Adani : ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्समध्ये अदानींनी थेट २३ व्या स्थानावरुन १८ व्या स्थानी उडी घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अदानी समुहाच्या शेअर्समघ्ये आलेल्या तेजीमुळे त्यांची संपत्ती आता ६४.२ अब्ज डाॅलर्स झाली आहे.
Gautam Adani : अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे अच्छे दिन पुन्हा येऊ लागले आहेत. हिडेनबर्गच्या झटक्यातून सावरुन अदानी पुन्हा एकदा आशियातील अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या स्थानी विराजमान झाले आहेत.मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत. अदानीने झोंग शानशान यांना पिछाडत दुसऱे स्थान भक्कम केले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्समध्ये अदानींनी २३ व्या स्थानावरुन १८ वे स्थान गाठले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अदानी समुहाच्या शेअर्समध्ये आलेल्या तेजीनंतर गौतत अदानींची संपत्ती आता ६४.२ अब्ज डाॅलर्स झाली आहे.मंगळवारी त्यांच्या संपत्तीत ४.३८ अब्ज डाॅलर्सची वाढ झाली होती. चीनचे झोंग शानशान आता ६२.४ अब्ज डाॅलर्ससह १९ व्या स्थानी आहेत. ते आशियातील सर्वात अब्जाधीशांच्या यादीत १३ व्या स्थानी आहेत. त्यांच्याकडे ८४.१ अब्ज डाॅलर्सची संपत्ती आहे.
बर्नार्ड अर्नाल्टला एका दिवसात ११.२ अब्ज डाॅलर्सचे नुकसान
दुसरीकडे जगातील अब्जाधीशांच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या बर्नार्ड अर्नाल्टला एका दिवसात ११.२ अब्ज डाॅलर्सचे नुकसान झाले आहे. आता त्यांची संपत्ती घसरुन २०० अब्ज डाॅलर्स राहिली आहे. एलन मस्कने काल २.२२ अब्ज डाॅलर्स गमवले आहेत. आता त्यांच्याकडे १८० अब्ज डाॅलर्सची संपत्ती आहे. जेफ बेजोसकडे १३९ अब्ज डाॅलर्सची संपत्ती आहे. ते तिसऱ्या स्थानी विराजमान आहेत.