Adani Wilmar Share : अदानी समूहाचा आणखी एक मोठा निर्णय; अदानी विल्मरमधून बाहेर पडणार, जाणून घ्या सविस्तर
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Wilmar Share : अदानी समूहाचा आणखी एक मोठा निर्णय; अदानी विल्मरमधून बाहेर पडणार, जाणून घ्या सविस्तर

Adani Wilmar Share : अदानी समूहाचा आणखी एक मोठा निर्णय; अदानी विल्मरमधून बाहेर पडणार, जाणून घ्या सविस्तर

Dec 30, 2024 06:44 PM IST

Adani Wilmar News in Marathi : विल्मर इंटरनॅशनलसोबतच्या अदानी विल्मर या संयुक्त उपक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय अदानी एन्टरप्राइझेसनं घेतला आहे.

अदानी समूहाचा आणखी एक मोठा निर्णय; अदानी विल्मरमधून बाहेर पडणार, जाणून घ्या सविस्तर
अदानी समूहाचा आणखी एक मोठा निर्णय; अदानी विल्मरमधून बाहेर पडणार, जाणून घ्या सविस्तर

Stock Market Updates : धारावी प्रकल्पाच्या नामांतरामुळं चर्चेत आलेल्या अदानी समूहानं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. समूहातील अदानी एंटरप्रायझेस (एईएल) या कंपनीनं अदानी विल्मर या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या संयुक्त उपक्रमातून पूर्णपणे बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. दोन टप्प्यांत ही निर्गुंतवणूक होणार आहे. 

अदानी विल्मर हा विल्मर इंटरनॅशनल आणि अदानी एन्टरप्राइझेसचा संयुक्त उपक्रम आहे. अदानी विल्मरमध्ये अदानी एन्टरप्राइझेसचा ४४ टक्के हिस्सा आहे. आता या उपक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय अदानी समूहानं घेतला आहे. या करारानुसार विल्मर इंटरनॅशनलची पूर्ण मालकीची उपकंपनी लेन्स पीटीई ही अदानी एंटरप्रायझेसची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या अदानी कमोडिटीजकडून अदानी विल्मरच्या पेड-अप इक्विटी शेअर्सपैकी ३१.०६% शेअर्स खरेदी करेल. हे शेअर्स प्रत्येकी ३०५ रुपयांत खरेदी केले जातील.

अदानी कमोडिटीज एलएलपी (एसीएल) आणि लेन्स प्रायव्हेट लिमिटेड (लेन्स) यांनी ३० डिसेंबर २०२४ रोजी एक करार केला आहे. त्यानुसार, लेन्स ही कंपनी कॉल पर्याय किंवा पुट पर्याय वापरण्याच्या तारखेपर्यंत एसीएलकडं असलेले अदानी विल्मरचे सर्व पेड-अप इक्विटी शेअर्स खरेदी करेल,' असं अदानी कंपनीनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

एसीएलनं नामनिर्देशित केलेले संचालक प्रणव व्ही अदानी आणि डॉ. मलय महादेविया अदानी विल्मरच्या संचालक मंडळाचा राजीनामा देतील. दोन्ही कंपन्यांनी एकत्र काम करण्यास आणि व्यवहार पूर्ण होण्याआधी किंवा पूर्ण झाल्यावर अदानी विल्मरचं नाव बदलण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्यास सहमती दर्शविली आहे.

अदानी एन्टरप्रायजेस आणि विल्मर हे अदानी विल्मरचे संस्थापक भागधारक आहेत. ४२,८२४.४१ कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह एफएमसीजी कंपनीची भारतातील ३०,६०० ग्रामीण शहरांमध्ये उपस्थिती आहे. कंपनी जागतिक स्तरावर ३० हून अधिक देशांमध्ये निर्यात करते.

शेअरवर कसा झाला परिणाम?

अदानी एन्टरप्रायझेस या निधीचा वापर ऊर्जा आणि युटिलिटी, ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक्स सारख्या मुख्य व्यवसायातील गुंतवणुकीस चालना देण्यासाठी करू इच्छित आहे. या घोषणेनंतर अदानी एन्टरप्रायझेसचा शेअर एनएसईवर ७.२६ टक्क्यांनी वधारून २,५८५ रुपयांवर बंद झाला. अदानी विल्मरच्या शेअरचा भाव एनएसईवर १.८१ टक्क्यांनी घसरून ३२३.२५ रुपयांवर बंद झाला.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner