मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks to buy : आज आठवड्याच्या पाचव्या सत्रात शेअर बाजार तेजीत, हे स्टाॅक्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Stocks to buy : आज आठवड्याच्या पाचव्या सत्रात शेअर बाजार तेजीत, हे स्टाॅक्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jun 02, 2023 10:12 AM IST

Stocks to buy : आज आठवड्याच्या पाचव्या सत्रात शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे. जर तुम्ही स्टाॅक्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अदानी एन्टरप्राईसेस, इन्फोसिससहित या स्टाॅक्समध्ये गुंतवणूक करु शकतात.

stocks to buy HT
stocks to buy HT

Stocks to buy : शेअर बाजारात गुंतवणूक करून कोणाला नफा कमवायचा नाही? तुम्हालाही शेअर्समध्ये गुंतवणूक करून, आजच्या व्यवसायात कोणते शेअर्स चढउतार नोंदवू शकतात आणि त्याचे कारण काय आहे ते जाणून घेऊया -

अदानी एन्टरप्राईजेस

गौतम अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस २ जूनपासून short-term अॅडिशनल सर्विलांस फ्रेमवर्कमधून बाहेर पडली आहे. सेबीने जारी केलेल्या परिपत्रकानुसार ही माहिती मिळाली आहे. या वर्षी २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी एंटरप्रायझेस आणि गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांनी त्यांच्या शेअर्सममध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता, ज्यामुळे स्टॉक एक्सचेंजने त्यांना अॅडिशनल सर्विलांसमध्ये ठेवले होते.

आदित्य बिर्ला कॅपिटल

आदित्य बिर्ला कॅपिटलच्या संचालक मंडळाने १२५० कोटी रुपयांचे प्रेफरेन्शिअल इश्यूला मंजूरी दिली आहे. त्याअंतर्गत इक्विटी फंडांच्या माध्यमातून अंदाजे ३००० कोटी रुपये जमवण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

कोल इंडिया

कोल इंडियाच्या आॅफर फाॅर सेल पहिल्याच दिवशी ३.४६ पट सबस्क्राईब्ड झाला आहे. सरकारने कोल इंडियाच्या आॅफर फाॅर सेलसाठी ओव्हर सबस्क्रिप्शन आॅप्शन सिलेक्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. रिटेल इन्व्हेस्टर कोल इंडियाच्या शेअर्ससाठी आज बोली लावू शकतात.

इंडसएंड बँक, इन्फोसिस

इंडसइंड बँक आणि इंन्फोसिसच्या स्टाॅक्सवर आज ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे. कारण आजपासून हे स्टाॅक्स एक्स डिव्हिडंन्ट होतील.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग