Q3 Results : अदानी एनर्जी सोल्यूशन्सची धडाकेबाज कामगिरी; नफ्यात जवळपास ८० टक्क्यांची वाढ
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Q3 Results : अदानी एनर्जी सोल्यूशन्सची धडाकेबाज कामगिरी; नफ्यात जवळपास ८० टक्क्यांची वाढ

Q3 Results : अदानी एनर्जी सोल्यूशन्सची धडाकेबाज कामगिरी; नफ्यात जवळपास ८० टक्क्यांची वाढ

Jan 23, 2025 05:46 PM IST

Adani Energy Solutions Q3 Results : अदानी समूहातील अदानी एनर्जी सोल्यूशन्सनं डिसेंबर तिमाहीत चमकदार कामगिरी करत ८० टक्क्यांचा नफा नोंदवला आहे.

अदानी एनर्जी सोल्यूशन्सची धडाकेबाज कामगिरी; नफ्यात जवळपास ८० टक्क्यांची वाढ
अदानी एनर्जी सोल्यूशन्सची धडाकेबाज कामगिरी; नफ्यात जवळपास ८० टक्क्यांची वाढ

अदानी समूहाच्या अदानी एनर्जी सोल्यूशन्स या कंपनीनं आर्थिक वर्ष २०२५ च्या डिसेंबर तिमाहीत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. या तिमाहीत अदानी एनर्जीला जवळपास ८० टक्के नफा झाला आहे. वाढीव उत्पन्नामुळं हे शक्य झालं असून नफ्याचा आकडा ६२५.३० कोटी रुपये झाला आहे. डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीला ३४८.२५ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. 

डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न वाढून ६०००.३९ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ते ४८२४.४२ कोटी रुपये होतं. ३१ डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत कामकाजातून मिळणारं उत्पन्न ५,८३० कोटी रुपये होते. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील ४,५६३ कोटी रुपयांच्या तुलनेत ते २८ टक्क्यांनी अधिक आहे. जुलै ते सप्टेंबर २०२४ या तिमाहीतील ६१८४ कोटी रुपयांच्या तुलनेत महसुलात ६ टक्क्यांची घट झाली आहे.

कंपनीच्या खर्चात वाढ

डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या खर्चात वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीचा खर्च १७ टक्क्यांनी वाढून ४,९७६ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ४,२५३ कोटी रुपये होता. तथापि, आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीतील ५६९४ कोटी रुपयांच्या तुलनेत तो १३ टक्क्यांनी कमी आहे.

कशी आहे शेअरची स्थिती?

अदानी एनर्जी सोल्यूशन्सचा शेअर इंट्राडेमध्ये ३ टक्क्यांहून अधिक वाढून ८२६.३० रुपयांवर पोहोचला होता. दिवसअखेर कंपनीचा शेअर ८०५.१० रुपयांवर स्थिरावला. कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत १३४७.९० रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत ५८८.२५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ९७३९३.९९ कोटी रुपये आहे. वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner