मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mumbai Metro: मुंबई मेट्रोला अदाणी समूहाकडून वीजपुरवठा होणार; MMRDAसोबत करार

Mumbai Metro: मुंबई मेट्रोला अदाणी समूहाकडून वीजपुरवठा होणार; MMRDAसोबत करार

HT Marathi Desk HT Marathi
Dec 04, 2022 12:05 PM IST

मुंबई शहरात दहिसर ते डीएन नगर दरम्यान धावणारी मेट्रो लाईन - 2A आणि दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व)दम्यान धावणारी मेट्रो 7 यांना आता अदाणी समूहाकडून वीजपुरवठा होणार आहे.

Adani to supply power for MMRDA’s two new metro lines
Adani to supply power for MMRDA’s two new metro lines (Bloomberg)

मुंबई शहरात दहिसर ते डीएन नगर दरम्यान धावणारी मेट्रो लाईन - 2A आणि दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) दरम्यान धावणारी मेट्रो 7 यांना आता अदाणी समूहाकडून वीजपुरवठा होणार आहे. याबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) सोबत नुकताच भागिदारी करार झाला आहे.

देशातील इतर शहरांप्रमाणे मुंबईतील वीज वितरणाची रचना ही जटिल प्रकारची आहे. महाराष्ट्रात बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्ट (BEST) आणि राज्य वीज वितरण उपक्रम म्हणजेच महावितरण (MSEDCL) या दोन प्रमुख सार्वजनिक कंपन्यांसह टाटा पॉवर आणि अदाणी इलेक्ट्रिसिटी यासारखे अनेक वीज वितरक आहेत. अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) ही कंपनी मुंबई उपनगरातील ३१ लाखांहून अधिक घरांना तसेच व्यावसायिकांना वीज पुरवठा करते.

‘गेल्या काही वर्षांपासून अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून विविध विमानतळ, डेटा सेंटर, रुग्णालये, मेट्रो रेल्वे, सॉफ्टवेअर पार्क आणि हॉटेलसारख्या ऊर्जा-केंद्रित आस्थापनांना वीजपुरवठा केला जात आहे. अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून समर्थित स्पर्धात्मक दरांमध्ये विश्वासार्ह आणि शाश्वत वीज पुरवठा व ग्राहक-केंद्रित सेवा दिली जात आहे’. असं अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले.

शहरातील मेट्रो लाईन - मेट्रो 2A (दहिसर-DN नगर) आणि मेट्रो 7 (दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व) सोबत भागीदारी करार केला आहे. याद्वारे दरवर्षी १२ कोटी युनिटपेक्षा अधिक वीज वापरली जाणार आहे. मुंबईत पूर्वी झालेल्या दोन ग्रीड आउटेज (वीजपुरवठा अचानक खंडित) दरम्यान अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून अखंडित वीजपुरवठा करण्यात आला होता. मुंबईतील ३०% विजेची मागणी पूर्ण करण्याच्या ध्येयाकडे कंपनी वाटचाल करत आहे, असल्याचं प्रवक्त्यानं सांगितलं.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या