Bonus Shares : ही कंपनी देणार १ : २ बोनस शेअर्स, गुंतवणूकदार खूष,शेअर्सला लागले अप्पर सर्कीट
Bonus Shares : हेल्थ केअर क्षेत्रातील कंपनी अच्युत हेल्थकेअर लिमिटेडने शनिवारी गुंतवणूकदारांना गुडन्यूज दिली. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुंतवणूकदारांना बोनस देणार असल्याचे जाहीर केले.
Bonus Shares : हेल्थ केअर क्षेत्रातील कंपनी अच्युत हेल्थकेअर लिमिटेडने शनिवारी गुंतवणूकदारांना गुडन्यूज दिली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुंतवणूकदारांना बोनस देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. कंपनीचा हा निर्णय अपेक्षित होता. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये सतत तेजी होती. गेल्या ३ सत्रात अच्युत हेल्थकेअर लिमिटेडच्या शेअर्समध्ये ५ टक्के अप्पर सर्कीट लागत आहे.
ट्रेंडिंग न्यूज
१८ मार्च २०२३ ला अच्युत हेल्थकेअरच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत कंपनीने १० रुपयांच्या दर्शनी मूल्यांच्या शेअर्सवर १ बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला. या बोनस इश्यूसाठी रेकाॅर्ड डेट २५ एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. ज्या गुंतवणूकदारांकडे हे शेअर्स आहेत त्यांना बोनस शेअर्सचा लाभ होईल.
सलग तीन दिवस अप्पर सर्कीट
शुक्रवारी अप्पर सर्कीट लागल्यानंतर शेअर्सचा भाव ४९.४९ रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. अच्युत हेल्थकेअरच्या शेअर्समध्ये १४ मार्च,१६ मार्च आणि १७ मार्चला ५ टक्के अप्पर सर्कीट लागले आहे. तर सहा महिन्यांपूर्वी स्टाॅक्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना होल्ड केल्यानंतर १७५ टक्के रिटर्न्स मिळाले आहेत. सध्या या कंपनीचे शेअर्स तिच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर आहेत.
संबंधित बातम्या