Mutual funds : मार्चमध्ये या इक्विटी म्युच्युअल फंडात झाली सर्वाधिक २,४३०.०४ कोटींची गुंतवणूक-according to association of mutual funds in india data rs 205341 crore invested in equity mutual funds in march ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual funds : मार्चमध्ये या इक्विटी म्युच्युअल फंडात झाली सर्वाधिक २,४३०.०४ कोटींची गुंतवणूक

Mutual funds : मार्चमध्ये या इक्विटी म्युच्युअल फंडात झाली सर्वाधिक २,४३०.०४ कोटींची गुंतवणूक

Apr 15, 2023 07:46 PM IST

Mutual funds : देशातील म्युच्युअल फंडांची एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) ३९,४२,०३१ कोटी रुपयांची झाली आहे. गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यात या फंडमध्ये २,४३०.०४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

mutual funds HT
mutual funds HT

Mutual funds : शेअर बाजारातील अस्थिरतेमध्येही गुंतवणूकदारांनी इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मार्चमध्येही कायम राहिली आहे.अॅम्फीच्या आकडेवारीनुसार, मार्चमध्ये इक्विटी फंडात एकूण २०,५४३.२१ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. गेल्या महिन्याच्या तुलनेत त्यात ३१ टक्क्यांची वाढ झाली आहे.

मार्च महिन्यातील गुंतवणूकीसंदर्भात अॅम्फीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील म्युच्युअल फंडांची एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) ३९,४२,०३१ कोटी रुपयांची झाली आहे. तर आर्थिक वर्ष २०२३ मध्ये म्युच्युअल फंडांनी इक्विटीमध्ये अंदाजे १.८१ लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. यापूर्वी हा आकडा २०२२ मध्ये अंदाजे १.२ लाख कोटी रुपये होता.

मार्चमध्ये सेक्टरल थीम फंडांमध्ये एकूण ३,९२८.९७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. दुसरीकडे डिव्हिडंड यील्ड इक्विटी फंड मार्चमध्ये ३,७१५.७५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी मार्चमध्ये गुंतवणूकदारांनी कर बचतीच्या ईएलएस ELSS योजनांमध्ये २,६८५.५८ कोटी जमा केले.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाचे मुख्य कार्यकारी एनएस व्यंकटेश म्हणाले, “भारत आणि त्याचा वाढता गुंतवणूकदार वर्ग म्युच्युअल फंड मार्गाने इक्विटी मार्केटवर विश्वास ठेवत आहे. इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये २००,००० कोटी रुपयांहून अधिक नेट इनफ्लोची नोंद केली आहे.

महिन्या-दर-महिन्याच्या आधारे विक्रम मोडत एसआयपी इनफ्लो सतत वाढत असून किरकोळ गुंतवणूकदार हा बाजाराचा नायक आहे असे म्हणणे आता वावगे ठरणार नाही. जागतिक भू-राजकीय कारणे आणि चलनवाढीमुळे अस्थिरता असूनही महामारीनंतरच्या काळात गुंतवणूकदारांमध्ये झालेली वाढ ही गुंतवणूकदारांच्या वर्तनात आलेल्या लवचिक धोरणाचा संकेत आहे.”

डेब्ट फंडांबद्दलच्या प्रश्नांना संबोधित करताना श्री. एन एस व्यंकटेश पुढे म्हणाले की, “गुंतवणूकदारांनी डेब्ट फंडांकडे कर कार्यक्षमतेच्या पलीकडे लक्ष दिले पाहिजे. हे फंड गुंतवणूकदारांना रिअल-टाइम तरलता देखील देतात ज्यामुळे गुंतवणूकदार एका दिवसात पैसे काढू शकतात. दीर्घकालीन डेब्ट फंड व्याजदराच्या हालचालींचा लाभ देतो. गुंतवणूकदारांनी त्यांच्या किटीमध्ये डेब्ट फंडासह संतुलित पोर्टफोलिओ आहे ना हे पाहणे आवश्यक आहे.”

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग