Dividend News : एका शेअरवर तब्बल ५० रुपये डिविडंड देणार ही कंपनी; लाभ घेण्याची अजूनही संधी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Dividend News : एका शेअरवर तब्बल ५० रुपये डिविडंड देणार ही कंपनी; लाभ घेण्याची अजूनही संधी

Dividend News : एका शेअरवर तब्बल ५० रुपये डिविडंड देणार ही कंपनी; लाभ घेण्याची अजूनही संधी

Jan 26, 2025 12:53 PM IST

Accelya Solutions India News : परताव्याच्या बाबतीत गुंतवणूकदारांना निराश करणाऱ्या अ‍ॅक्सेलिया सोल्यूशन्स इंडिया या कंपनीनं नव्या वर्षात घसघशीत डिविडंची घोषणा केली आहे.

एका शेअरवर तब्बल ५० रुपये डिविडंड देणार ही कंपनी; लाभ घेण्याची अजूनही संधी
एका शेअरवर तब्बल ५० रुपये डिविडंड देणार ही कंपनी; लाभ घेण्याची अजूनही संधी

Dividend Stock : लाभांश देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अ‍ॅक्सेलिया सोल्यूशन्स इंडिया या कंपनीनं घसघशीत डिविडंडची घोषणा केली आहे. कंपनी एका शेअरवर ५० रुपये लाभांश देणार आहे. लाभांशाची रेकॉर्ड डेट ३० जानेवारी ही आहे.

कंपनीनं नुकतीच स्टॉक एक्स्चेंजला या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर ५० रुपये लाभांश देण्यात येणार आहे. कंपनीनं या लाभांशासाठी ३० जानेवारी २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांची नावं या दिवशी रेकॉर्ड बुकमध्ये राहतील, त्यांना लाभांशाचा लाभ मिळणार आहे.

मागील वर्षी दोनदा दिला होता डिविडंड

यावर्षी कंपनी पहिल्यांदाच एक्स-डिव्हिडंडचा व्यवहार करणार आहे. २०२४ मध्ये कंपनीनं दोन वेळा कंपनीनं गुंतवणूकदारांना डिविडंडची भेट दिली होती. एकदा कंपनीनं प्रति शेअर ४० रुपये तर दुसऱ्यांदा २५ रुपये प्रति शेअर लाभांश दिला होता.

शेअर बाजारात कशी आहे कामगिरी?

मागील वर्षभरात शेअरची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. या कालावधीत कंपनीनं गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा दिला आहे. शुक्रवारी व्यवहार संपला तेव्हा एनएसईवर कंपनीच्या शेअरचा भाव ०.१६ टक्क्यांनी वधारून १४९८.३० रुपयांवर होता. परताव्याच्या बाबतीत ही कंपनी पिछाडीवर आहे. गेल्या वर्षभरात एनएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत १७.८० टक्क्यांनी घसरली आहे. या काळात सेन्सेक्समध्ये ७.९५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

पाच वर्षांत ४३ टक्क्यांची वाढ

ज्या गुंतवणूकदारांनी दोन वर्षे कंपनीचे शेअर्स ठेवले आहेत, त्यांना सध्या नकारात्मक परतावा मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांत कंपनीच्या शेअरची किंमत ९ टक्क्यांहून अधिक घसरली आहे. तर बीएसई सेन्सेक्स निर्देशांकानं २४.९५ टक्के परतावा दिला आहे. ५ वर्षांत कंपनीचे शेअर्स ४३ टक्क्यांनी वधारले आहेत. पण सेन्सेक्स निर्देशांकाच्या तुलनेत हा परतावा नगण्य आहे. बीएसई निर्देशांकात या काळात ८३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner