मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Lenskart IPO : लेंसकार्ट कंपनीची मोठी डील, आयपीओपूर्वीच मिळाली इतक्या कोटींची गुंतवणूक

Lenskart IPO : लेंसकार्ट कंपनीची मोठी डील, आयपीओपूर्वीच मिळाली इतक्या कोटींची गुंतवणूक

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 16, 2023 03:28 PM IST

Lenskart IPO : लेंसकार्टने गेल्या १२ वर्षांत साॅफ्टबँक आणि अल्फा वेब ग्लोबल कंपन्यांचा विश्वास जिंकणारी भारतीय आयवेअर स्टार्टअप आहे. आयवेअर मार्केटमध्ये लेंसकार्टचा हिस्सा मोठा आहे.

lenskart IPO HT
lenskart IPO HT

Lenskart IPO : चष्मा बनवणाऱी कंपनी लेंसकार्टला मोठी गुंतवणूक मिळाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथाॅरिटीकडून ५०० दशलक्ष डाॅल्रर्स जमवण्यासाठी एक डील करण्यात आली आहे. या रक्कमेमधून भारतीय कंपनी लेंसकार्ट व्यवसायाचे विस्तारीकरण करणार आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठतही आपले स्थान मिळवणार आहे. ही गुंतवणूक गेल्या वर्षीत्या फंडिंग राऊंडचे विस्तारीकरण आहे. डेटा इंटेलिजन्स प्लॅटफाॅर्म ट्रॅकसननुसार, लेंसकार्टने आतापर्यंत प्राथमिक आणि सेकेंडरी फंडिंग राऊंडमध्ये एकूण १.५ अब्ज डाॅलर्स जमवले आहेत.

गेल्या वर्षी लेंसकार्टने जपानमधील ओनडेजमध्ये मोठा हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली होती. या करारामध्ये जपानी कंपनीचे मूल्यांकन अंदाजे ४० कोटी डाॅलर्स ठऱवण्यात आले होते.लेसकार्ट गेल्या १२ वर्षात साॅफ्टबँक आणि अल्फा वेब ग्लोबलकडून विश्वास जिंकणारी भारतीय स्टार्टअप कंपनी आहे. कंपनीची योजना आयपीओ आणण्याचीही आहे.

लेंसकार्टचे सीईओ आणि सहसंस्थापक पीयुष बंन्सल यांनी २०२२ मध्ये सांगितले होते की , कंपनी आगामी तीन वर्षांच्या आत भारतीय शेअर बाजारात लिस्टेड होण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानुसार, आगामी २४ महिने अथवा ३६ महिन्यांच्या कालावधीत आयपीओ येऊ शकतो.

नव्या फंडींगचा उपयोग

नव्या फंडींगचा उपयोग कंपनी भारतात आपली उपस्थिती वाढवण्यासाठी आणि आशिया आणि मध्य पूर्वेतील आंतरराष्ट्रीय उपस्थिती वाढवण्यासाठी करणार आहे. लेंसकार्टचे सध्या २००० पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. त्यापैकी १५०० स्टोअर्स हे भारतात आहेत आणि बाकीचे दक्षिण पूर्व आशिया आणि मध्य पूर्वमध्ये आहेत. लेन्सकार्टचा नवीन कारखानाही लवकरच सुरू होणार आहे. यामध्ये आयवेअरच्या २ कोटी जोड्या तयार केल्या जाऊ शकतात.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग