nps news : एनपीएसचं खातं उघडलंय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची-aadhaar verification mandatory in nps account new system will be implemented from april 1 ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  nps news : एनपीएसचं खातं उघडलंय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची

nps news : एनपीएसचं खातं उघडलंय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची

Feb 22, 2024 11:55 AM IST

NPS Account Verification news : पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरणानं एनपीएस खात्याशी संबंधित नियमामध्ये महत्त्वाचा बदल केला आहे.

aadhaar verification mandatory in nps account
aadhaar verification mandatory in nps account

NPS Account Verification news : पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणानं (PFRDA) नॅशनल पेन्शन स्कीमच्या खात्यांबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीएफआरडीएनं या खात्यांची आधार पडताळणी (Aadhaar Verification) सक्तीची केली आहे. हा नवा नियम १ एप्रिलपासून लागू होणार आहे.

या संदर्भात पीएफआरडीएनं नुकतंच एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी (CRA) च्या प्रणालीमध्ये लॉग इन करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय योजण्यात आले आहेत. एनपीएस खातेधारक आणि त्याच्याशी संबंधित सर्व संस्थांचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या नियमानुसार, आता सीआरए सिस्टममध्ये लॉग इन करण्यासाठी दोन स्तरांवर प्रमाणीकरण (Two Factor Authentication) केलं जाणार आहे. सीआरए हा वेब आधारित प्लॅटफॉर्म असून एनपीएसशी संबंधित कामांसाठी खास या प्लॅटफॉर्मची रचना करण्यात आली आहे.

सध्याची पद्धत काय आहे?

सध्या NPS सदस्यांना खात्यात लॉग इन करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड आवश्यक आहे. एवढं केल्यानंतर लॉग-इन करून खात्यात काही बदल आणि पैसे काढणं शक्य होतं. केंद्र आणि राज्य सरकारचे नोडल अधिकारी देखील सीआरए प्रणालीमध्ये लॉग इन करण्यासाठी पासवर्ड आधारित पद्धत वापरतात. मात्र यापुढं अधिक सुरक्षेसाठी आधार आधारित पडताळणी अनिवार्य असेल.

असा करता येईल वापर

पीएफआरडीएनं दिलेल्या माहितीनुसार, आधार आधारित लॉग-इन पडताळणी एनपीएस सदस्याच्या युजर आयडीशी जोडले जाईल. यानंतर आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर एनपीएस खात्यात लॉग इन करता येणार आहे.

Whats_app_banner
विभाग