Relience Jio Prepaid Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी रकमेचा चांगला प्लान शोधणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे बाजारात अनेक प्रीपेड प्लान बाजारात उपलब्ध आहेत, जे ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत ग्राहकांना चांगल्या सुविधा देतात. जिओच्या या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता, दररोज ३ जीबीपर्यंत डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस मिळतात.
जिओच्या २९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड व्हॉईस कॉल, दररोज १.५ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. जिओच्या या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण ४२ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊड सारख्या जिओ अॅप्सचा अॅक्सेस देखील मिळतो.
जिओच्या या ४४८ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल, दररोज २ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये सोनीलिव्ह, झी ५, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी+, सन एनएक्सटी, कांचा लंका, प्लॅनेट मराठी, चौपाल, फॅनकोड आणि होईचोई सह १२ ओटीटी अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते, जे जिओ टीव्ही अॅपद्वारे उपलब्ध आहेत.
जिओच्या ३९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड व्हॉईस कॉल, दररोज १०० एसएमएस आणि दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये एकूण ७० जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊड सारख्या जिओ अॅप्सचा अॅक्सेस आणि अनलिमिटेड 5G डेटा मिळतो.
जिओच्या ३४९ रुपयांचा 5G प्लानमध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड व्हॉईस कॉल, दररोज १०० एसएमएस आणि दररोज २ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊड सारख्या जिओ अॅप्सचा अॅक्सेस आणि अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळतो.
जिओच्या ३२९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड व्हॉईस कॉल, दररोज १०० एसएमएस आणि दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये एकूण ४२ जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओसिनेमा, जिओक्लाउड आणि जिओ सावन प्रो सारख्या जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते.