7th Pay commission : महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका बसण्याची शक्यता
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  7th Pay commission : महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका बसण्याची शक्यता

7th Pay commission : महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका बसण्याची शक्यता

Aug 11, 2023 12:20 PM IST

7th Pay Commission DA Hike : केंद्र सरकारने आपल्या १ कोटींपेक्षा अधिक कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवून ४५ टक्के करण्याची शक्यता आहे. डीएमधील वाढ १ जुलै २०२३ पासून लागू केली जाईल.

7 th pay commission HT
7 th pay commission HT

7th Pay Commission DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्ष २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत महागाई भत्त्याची प्रतिक्षा आहे. निवृत्तीवेतन धारकांनाही महागाईमध्ये दिलासा अधिक फायदा मिळेल अशी अपेक्षा आहे. मिडिया रिपोर्टनुसार, यावेळी डीए आणि डीआरमध्ये ३ टक्क्यांची वाढ होईल. जर असे झाल्यास ४ टक्के डीए वाढीच्या प्रतिक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा खालावल्या आहेत.

महागाई भत्ता प्रत्येक महिन्यात सरकारच्या श्रम मंत्रालयाद्वारे जारी करण्यात येणाऱ्या औद्योगिक कर्मचाऱ्यांच्या उपभोक्ता मूल्य निर्देशांक (AICPI-IW) च्या आधारावर निश्चित केला जातो. जून २०२३ साठी AICPI-IW नुकताच जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार हा निर्देशांक दर ३ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यामुळे महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ अपेक्षित आहे. दरम्यान आॅल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनचे महासचिव शिव गोपाल मिश्रा यांच्या मते, सरकार एका विशिष्ट पातळीपेक्षा वर डीए वाढवण्यासाठी तयार नाही. याचाच अर्थ सरकार डीए अथवा डीआरमध्ये ३ टक्के वाढ करू शकते.

किती होईल डीए

केंद्र सरकार आपल्या एक कोटींपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भक्ता ३ टक्क्यांनी वाढवून ४५ टक्के करण्याची शक्यता आहे. डीए वाढ एक जुलै २०२३ पासून लागू करण्यात येईल. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. डीएमध्ये शेवटची वाढ २४ मार्च २०२३ ला करण्यात आली होती. ती १ जानेवारी २०२३ पासून लागू झाली होती.

Whats_app_banner