7th pay commission : दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने आपल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता म्हणजेच डीआरचा अतिरिक्त हप्ता देण्याचा आदेश जारी केला आहे. कार्मिक मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने केंद्र सरकारच्या सर्व पेन्शनर / कौटुंबिक पेन्शनधारकांसाठी ३० ऑक्टोबर २०२४ रोजी एक आदेश जारी केला आहे.
कौटुंबिक पेन्शनधारकांसह केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना आता महागाई भत्ता आणि महागाई सवलतीची अधिक रक्कम मिळणार आहे. या अंतर्गत त्यांना त्यांच्या मूळ पेन्शनच्या ५० टक्क्यांऐवजी ५३ टक्के बेसिक पेन्शन/फॅमिली पेन्शन आणि महागाई सवलत मिळणार आहे. ही वाढ १ जुलैपासून लागू होणार आहे. म्हणजेच गेल्या चार महिन्यांच्या वाढीव भत्त्यामुळे पेन्शनधारकांना थकित रक्कम मिळणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने १६ ऑक्टोबर रोजी केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना तीन टक्के महागाई भत्ता (डीए) आणि महागाई भत्ता (डीआर) च्या अतिरिक्त हप्त्यांना मंजुरी दिली होती.