मराठी बातम्या  /  बिझनेस  /  7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी, पेन्शनर्सना मोदी सरकारचं फेस्टिव्ह गिफ्ट! सप्टेबरअखेरीपर्यंत वाढणार महागाई भत्ता

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी, पेन्शनर्सना मोदी सरकारचं फेस्टिव्ह गिफ्ट! सप्टेबरअखेरीपर्यंत वाढणार महागाई भत्ता

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Sep 07, 2023 07:30 PM IST

7th Pay Commission: नवरात्रीच्या काही दिवस आधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे.

7 th pay comission HT
7 th pay comission HT

7th Pay Commission: सणांची सुरूवात धडाक्यात झाली आहे. गणेशोत्सव अवघ्या १५ दिवसांवर आला आहे. नवरात्री दिवाळी त्यापाठोपाठ येतीलच, त्यामुळे आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आपल्या लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेंन्शनर्सना फेस्टिव्ह गिफ्ट्स देण्याची तयारी सुरू केली आहे. सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत संसदेच्या शेवटच्या विशेष सत्रानंतर मोदी सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेंन्शनर्सच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची अपेक्षा आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट मंत्री केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेंन्शनर्सच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

३ टक्के वाढ होण्याची शक्यता

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक जुलै महिन्यापासून महागाई भत्त्यात वाढ होण्याची प्रतीक्षा करत आहेत. केंद्र सरकार सध्या असलेला महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४५ टक्क्यांपर्यंत ३ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय १ जुलैपासून लागू होणार आहे. हा वाढीव भत्ता ऑक्टोबर महिन्याचा पगार महागाई भत्त्यात वाढीसह दिला जाईल. जुलै ते सप्टेंबरची थकबाकी ऑक्टोबरच्या पगारासह मिळू शकते. आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा ४७ लाख कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

नवरात्रीपूर्वी मिळू शकते गुडन्यूज

१५ ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत असून २४ ऑक्टोबरला दसरा आहे. त्यामुळे या महिन्यात केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. दरवर्षी सरकार महागाई भत्त्यात दोनदा वाढ करते. पहिल्या टप्प्यातील महागाई भत्त्यात वाढ जानेवारीपासून आणि दुसऱ्या टप्प्यात जुलै महिन्यापासून लागू होईल. किरकोळ महागाईच्या आकडेवारीच्या आधारे डीए आणि डीआरमध्ये बदल केले जातात. ऑगस्ट २०२३ मध्ये, जुलै महिन्यासाठी किरकोळ महागाई दर ७.४४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर अन्नधान्य महागाई दर ११.५१ टक्के आहे. अशा परिस्थितीत सरकार महागाईतून दिलासा देईल, अशी आशा केंद्रीय कर्मचाऱ्यांना आहे.

WhatsApp channel

विभाग