Dividend Stocks News : लाभांशाच्या रूपानं नियमित उत्पन्न मिळवण्याचं लक्ष्य ठेवून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज मोठी संधी आहे. मागील काही दिवसांत अनेक कंपन्यांनी लाभांश जाहीर केला असून त्यापैकी सहा कंपन्यांची आज रेकॉर्ड डेट आहे. त्यामुळं आज या कंपनीचे शेअर घेणारे गुंतवणूकदार लाभांशासाठी पात्र ठरणार आहेत.
आज रेकॉर्ड डेट असलेल्या कंपन्यांमध्ये महानगर गॅस लिमिटेड, सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन, सोना बीएलडब्ल्यू, तानला प्लॅटफॉर्म, अॅपकोटेक्स इंडस्ट्रीज आणि कोफोर्ज या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी नेमका किती लाभांश जाहीर केला आहे. पाहूया…
महानगर गॅस कंपनीनं १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर १२ रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं आजची, ५ फेब्रुवारी ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे.
सीजी पॉवर कंपनीनं एका शेअरवर १.३० रुपये लाभांश जाहीर केला आहे. आजच्या तारखेला कंपनीच्या रेकॉर्डवर नाव असलेल्या पात्र गुंतवणूकदारांना हा लाभांश मिळेल.
कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर १.५३ रुपये लाभांश देत आहे. त्याची रेकॉर्ड डेट ५ फेब्रुवारी म्हणजेच आज आहे.
तानला प्लॅटफॉर्म ही कंपनी आज शेअर बाजारात एक्स-डिव्हिडंड ट्रेड करेल. कंपनीनं २०२३-२४ या वर्षासाठी प्रति शेअर ६ रुपये अंतरिम लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.
अॅपकोटेक्स इंडस्ट्रीज ही कंपनी २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर २ रुपये लाभांश देत आहे. या अंतरिम लाभांशासाठी कंपनीनं आजची रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.
कोफोर्ज कंपनीनं पात्र गुंतवणूकदारांना १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर १९ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. कंपनी आज म्हणजेच ५ फेब्रुवारी रोजी शेअर बाजारात एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून व्यापार करेल. अर्थात, आज ज्याचं नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये आहे त्यांनाच लाभांशाचा लाभ मिळेल.
(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)