Budget Smartphones: बजेट स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. बाजारात असे काही स्मार्टफोन आहेत, ज्यांची किंमत १० हजारांपेक्षा कमी आहे आणि त्यामध्ये चांगला कॅमेरा देखील मिळतो. त्यामुळे ग्राहकांना आता कमी चांगले फीचर्स असलेले स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. अशा स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊयात.
रेडमी १४ सी 5G हा नुकताच लॉन्च झालेला बजेट स्मार्टफोन आहे, यात ६.८८ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन ४ जेन २ ५ जी सारखा दमदार प्रोसेसरसह येतो. यात ४ जीबी रॅम मिळते. या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तसेच ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
मोटोरोला जी३५ 5G हा फोन असंख्य फीचर्सने सुसज्ज असलेला हा आणखी एक 5g स्मार्टफोन आहे. यात ६.७ इंचाचा आयपीएस एलसीडी एफएचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो. हा स्मार्टफोन युनिसॉक टी ७६० प्रोसेसरवर चालतो. या फोनमध्ये ४ जीबी रॅम मिळते. तसेच यात ५० मेगापिक्सेलचा एआय-संचालित कॅमेरा देण्यात आला आहे.
दहा हजारांच्या आत येणाऱ्या ५जी स्मार्टफोनसाठी हा आणखी एक पर्याय आहे. यात ६० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७ इंचाचा पीएलएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलियो जी८५ प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ६ जीबी रॅम देण्यात आले आहे. यात ड्युअल कॅमेरा सेटअप असून ५० मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे.
टेक्नो पीओपी ९ 5G स्मार्टफोनमध्ये १२० हर्ट्झडिस्प्ले आहे जो स्मूथ अनुभव देतो. हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० ५जी सारखा दमदार प्रोसेसरसह येतो. यात ८ जीबी रॅम देण्यात आली आहे. यात ४८ मेगापिक्सेलचा सोनी एआय कॅमेरा आहे.
दहा हजारांच्या आत मिळणाऱ्या स्मार्टफोनमध्ये आयक्यूओओ झेड ९ लाइट 5G हा चांगला पर्याय आहे. हा फोन गेल्यावर्षी लॉन्च झाला होता. हा एक बजेट स्मार्टफोन आहे जो मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० 5G चिपसह येतो. त्याचबरोबर यात 5G व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि ड्युअल स्लिम 5G क्षमता आहे. यात ५० मेगापिक्सेलचा सोनी एआय कॅमेरा आहे.
आयटेल कलर प्रो 5G हा व्हॅल्यू फॉर मनी स्मार्टफोन आहे. हे उत्कृष्ट परफॉर्मन्स आउटपुट देते, जे 5G समर्थन प्रदान करते. यात दीर्घ बॅटरी लाइफ मिळते. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ६.६ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ५० मेगापिक्सेलचा ड्युअल प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनसोबत तुम्हाला ६ जीबी रॅम देण्यात आली आहे.
सॅमसंगचा हा फोन सुंदर मिंट ग्रीन कलरमध्ये येतो. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. कॅमेऱ्याच्या दृष्टीनेही हा फोन परफेक्ट आहे. यात ५० मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. यात ६.७ इंचाएचडी+ डिस्प्लेसह ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यात अँड्रॉइड १४ ऑपरेटिंग सिस्टिम आहे.
संबंधित बातम्या