मराठी बातम्या  /  बिझनेस  /  multibagger penny stock : ५० पैशांच्या शेअरनं केली मोठी कमाल; गुंतवणूकदार झाले अक्षरश: मालामाल

multibagger penny stock : ५० पैशांच्या शेअरनं केली मोठी कमाल; गुंतवणूकदार झाले अक्षरश: मालामाल

Jun 24, 2024 07:14 PM IST

multibagger penny stock : काही वर्षांपूर्वी ५० पैसे किंमत असलेल्या वामा इंडस्ट्रीजच्या शेअरनं गुंतवणूकदारांना त्यांच्या संयमाचं खूपच गोड फळ दिलं आहे.

५० पैशांच्या शेअरची कमाल आमि धमाल! गुंतवणूकदार झाले अक्षरश: मालामाल
५० पैशांच्या शेअरची कमाल आमि धमाल! गुंतवणूकदार झाले अक्षरश: मालामाल

multibagger penny stock : एखादा 'चिंटू' शेअर जर मल्टीबॅगर ठरला तर गुंतवणूकदारांना किती मालमाल करू शकतो, याची प्रचिती वामा इंडस्ट्रीजच्या शेअरनं दिली आहे. केवळ ५० पैशांच्या शेअरनं गुंतवणूकदारांना आतापर्यंत १२२२ टक्के परतावा दिला आहे.

सलग ३ ट्रेडिंग सेशन्समध्ये या शेअरला अप्पर सर्किट आहे. हा पेनी स्टॉक आज १० टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह उघडला. आता तो ६.६१ रुपयांवर पोहोचला आहे. आज ७४ कोटी ३२ लाख रुपयांची ऑर्डर मिळाल्यानंतर वामा इंडस्ट्रीजचे समभाग वरच्या सर्किटवर आहेत.

वामा इंडस्ट्रीजला ७४.३२ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीचा शेअर तब्बल १० टक्क्यांनी वधारला आहे. ४७,४४,५८० शेअर्सच्या खरेदी ऑर्डर प्रलंबित आहेत. वामाचे शेअर्स विकायला कोणीच तयार नव्हते. आज सर्व खरेदीदार रांग लावून होते.

ट्रेंडिंग न्यूज

वामाच्या शेअरच्या भावाचा इतिहास पाहिला तर या शेअरनं २१ फेब्रुवारी २०२४ रोजी ७.२ रुपयांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक नोंदवला होता. तर, २६ ऑक्टोबर २०२३ रोजी हा शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होता. त्या दिवशी हा शेअर ४ रुपयांवर होता. हा शेअर सध्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीपेक्षा ८.१९ टक्क्यांनी खाली आणि ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीच्या ६५.२५ टक्के वर व्यवहार करत आहे.

अवघ्या तीन दिवसांत ४० टक्के वाढ

गेल्या तीन दिवसांत शेअरच्या किंमतीत जवळपास ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका महिन्यात २६ टक्के आणि ६ महिन्यांत ३८ टक्के परतावा दिला आहे. ६ फेब्रुवारी २००४ रोजी त्याच्या शेअरची किंमत ५० पैसे होती.

कंपनीला न्यूस्पेस इंडिया लिमिटेडकडून ७४.३२ कोटी रुपयांची पुरवठा ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरमध्ये टर्न-की तत्त्वावर सेंट्रल आर्काइव्ह फॅसिलिटी (CAF) सोल्यूशन्ससाठी श्रेणीबद्ध स्टोरेज मॅनेजमेंट (HSM) प्रणाली आणि सर्व्हरच्या पुरवठ्याचा समावेश आहे. या ऑर्डरनुसार, २४ आठवड्यात डेटा मायग्रेशनसह इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंग केले जाणार आहे, तर इन्स्टॉलेशननंतर प्रशिक्षण, वॉरंटी आणि सपोर्ट सर्व्हिस ७ वर्षांच्या कालावधीसाठी असेल.

वामा इंडस्ट्रीज लिमिटेड प्रामुख्यानं आयटी आणि आयटीईएसमध्ये व्यवसाय करते. ही कंपनी सरकार, उद्योग, व्यवसाय व अन्य क्षेत्रातील वापरासाठी संगणक प्रणाली, दळणवळण किंवा संगणक आणि कम्युनिकेशन प्रणालींच्या सॉफ्टवेअर सिस्टमचा अभ्यास, अ‍ॅनालिटिक्स डिझाइन, विकास आणि अंमलबजावणीचा व्यवसाय करते.

(डिस्क्लेमर: वरील वृत्त हे केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

WhatsApp channel