Vivo T3 Ultra: ५० मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेला विवो टी३ अल्ट्रा झाला स्वस्त, फ्लिपकार्टची धमाकेदार डील!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Vivo T3 Ultra: ५० मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेला विवो टी३ अल्ट्रा झाला स्वस्त, फ्लिपकार्टची धमाकेदार डील!

Vivo T3 Ultra: ५० मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेला विवो टी३ अल्ट्रा झाला स्वस्त, फ्लिपकार्टची धमाकेदार डील!

Nov 11, 2024 11:14 PM IST

Vivo T3 Ultra Price Drop: फ्लिपकार्टवर विवोचा ५० मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेल्या विवो टी३ अल्ट्रा फोनच्या खरेदीवर ग्राहकांना मोठी सूट मिळत आहे.

५० मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेला विवो टी३ अल्ट्रा झाला स्वस्त
५० मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेला विवो टी३ अल्ट्रा झाला स्वस्त

Vivo T3 Ultra Price, Offers and Discounts: जबरदस्त सेल्फी कॅमेरा असलेला फोन घेण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलमध्ये ग्राहकांना अनेक स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठी सूट मिळत आहे.  या बंपर डीलमध्ये विवोचा ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा फोन असलेला विवो टी३ अल्ट्रा दमदार डीलमध्ये उपलब्ध आहे. फोनच्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत ३५ हजार ९९९ रुपये आहे. सेलमध्ये कंपनी सर्व बँक कार्डवर ३ हजार रुपयांची सूट देत आहे.

हा फोन खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेचे कार्ड वापरत करणाऱ्या ग्राहकांसाठी
५ टक्के कॅशबॅक मिळेल. एक्स्चेंज ऑफरमध्ये हा फोन ३५ हजार रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. पण एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट तुमच्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीवर अवलंबून असेल. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

विवो टी३ अल्ट्रा: डिस्प्ले 

कंपनी या फोनमध्ये २८०० x १२६० पिक्सल रिझोल्यूशनसह ६.७८ इंचाचा 1.5K एमोलेड डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये देण्यात येणारा हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याची पीक ब्राइटनेस लेव्हल ४५०० निट्स आहे. 

विवो टी३ अल्ट्रा: स्टोरेज

फोनमध्ये १२ जीबी पर्यंत एलपीडीडीआर ४एक्स रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे. प्रोसेसर म्हणून यात तुम्हाला डायमेंसिटी ९२००+ चिपसेट पाहायला मिळेल.

विवो टी३ अल्ट्रा: कॅमेरा

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे आहेत. यामध्ये 50 मेगापिक्सलच्या मेन लेन्ससह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये दिलेला मुख्य कॅमेरा ओआयएससोबत येतो. सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

विवो टी३ अल्ट्रा: बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी

फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी ५५०० एमएएच ची आहे. ही बॅटरी ८० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. ओएसबद्दल बोलायचे झाले तर फोन अँड्रॉइड १४ वर आधारित फनटच ओएस १४ वर काम करतो.

 

Whats_app_banner