50 megapixel camera Smartphones: नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढच्या आठवड्यात अनेक जबरदस्त स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहेत. या आगामी फोनच्या यादीत रेडमी, विवो आणि आसुसच्या स्मार्टफोनचा समावेश आहे. या स्मार्टफोन्समध्ये ग्राहकांना २०० मेगापिक्सलपर्यंतचा पेरिस्कोप कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सलपर्यंतचा सेल्फी कॅमेरा पाहायला मिळणार आहे. याशिवाय, या फोनमध्ये उत्तम डिस्प्ले आणि दमदार प्रोसेसरसह ९० वॉटपर्यंत चार्जिंग मिळेल.
१) आसुस आरओजी फोन ९
आसुसचा हा फोन १९ नोव्हेंबरला लॉन्च होणार आहे. हा फोन दोन नव्या व्हेरिएंटसह लॉन्च होण्याची शक्यता आहे. नवीन फोनमध्ये प्रोसेसर म्हणून कंपनी स्नॅपड्रॅगन 8 एलिट ऑफर करणार आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, कंपनी या सीरिजच्या बेस व्हेरियंटमध्ये १६५ हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह ६.७८ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देऊ शकते. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला जाऊ शकतो. याशिवाय, फोनच्या मागील बाजूस १३ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळू शकतो. सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देऊ शकते. हा फोन ५८०० एमएएच बॅटरीसह येऊ शकतो, जो ६५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
२) विवो एक्स २०० सीरिज
विवोची ही स्मार्टफोन सीरिज १९ नोव्हेंबरला जागतिक बाजारात लॉन्च होणार आहे. विवो एक्स २०० सीरिज सर्वात प्रथम मलेशियात दाखल होणार आहे. या सीरिजमध्ये कंपनी एक्स २०० आणि एक्स२०० प्रो स्मार्टफोन देणार आहे. एक्स २०० प्रो मिनी देखील या सीरिजमध्ये येतो, पण कंपनी त्याला चीनबाहेर लॉन्च करणार नाही. लीक झालेल्या माहितीनुसार, कंपनी सीरिजच्या बेस आणि प्रो व्हेरियंटमध्ये प्रोसेसर म्हणून डायमेंसिटी ९४०० चिपसेट देणार आहे. देण्यात आलेला एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यामध्ये तुम्हाला ९० वॅटफास्ट चार्जिंग मिळेल. फोटोग्राफीसाठी दोघांनाही ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरासह ५० मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल लेन्स मिळेल. प्रो व्हेरियंटमध्ये कंपनी २०० मेगापिक्सलचा पेरिस्कोप कॅमेराही देणार आहे. प्रो व्हेरियंट ३० वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.
३) रेडमी ए४ 5G
रेडमीचा हा फोन २० नोव्हेंबरला भारतीय बाजारात दाखल होणार आहे. कंपनीचा हा 5G फोन ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटसोबत येणार आहे. याच्या बेस व्हेरियंटची किंमत ऑफरसह ८ हजार ४९९ रुपये असू शकते. लीक झालेल्या माहितीनुसार, फोनमध्ये तुम्हाला ६.८८ इंचाचा डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. प्रोसेसर म्हणून कंपनी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४ एस जेन २ ऑफर करणार आहे. फोनचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला ५१६० एमएएच ची बॅटरी मिळेल.
विवो वाय ३००
विवो हा फोन २१ नोव्हेंबर ला भारतात लॉन्च करणार आहे. या फोनमध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन ४ जेन २ चिपसेट मिळेल. फोनचा डिस्प्ले ६.७ इंचाचा आहे. हा ओएलईडी डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देणार आहे. याची बॅटरी ५००० एमएएच ची आहे. हा फोन टायटॅनियम सिल्व्हर, डायनॅमिक ब्लॅक आणि एमराल्ड ग्रीन या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.