मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Rules for investor : १ एप्रिलपासून गुंतवणूकदारांसाठी हे नियम बदलणार, असे करा तुमचे खाते अपडेट

Rules for investor : १ एप्रिलपासून गुंतवणूकदारांसाठी हे नियम बदलणार, असे करा तुमचे खाते अपडेट

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 28, 2023 04:42 PM IST

Rules for investor : गुंतवणूकदारांसाठी येत्या १ एप्रिलपासून ३ नवे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत डीमॅट आणि म्युच्युअल फंड खाते अपडेट केले नाही तर तुम्हाला जबरदस्त नुकसान झेलावे लागेल.

money HT
money HT

Rules for investor : गुंतवणूकदारांसाठी १ एप्रिल २०२३ पासून ३ नवे नियम बदलणार आहेत. जर ३१ मार्चपूर्वी तुमचे डीमॅट खाते आणि म्युच्युअल फंड्स खात्यात अपडेट केले नाही तर मोठे नुकसान उचलावे लागू शकते. एक नियम एप्रिल महिन्याच्या शेवटीही बदलणार आहे. जाणून घेऊया कोणते नियम आहेत ते -

ट्रेंडिंग न्यूज

नियम १ - म्युच्युअल फंड नाॅमिनेशन

पहिला नियम हा म्युच्युअल फंड नाॅमिनेशनसंदर्भातील आहे. म्युच्युअल फंडाच्या सध्याच्या गु्ंतवणूकदारांजवळ आपल्या नाॅमिनेशनचे नाव देण्याची अंतिम मुदत ३१ मार्च आहे. असे न केल्यास गुंतवणूकदारांचे खाते बंद केले जाईल. जो गुंतवणूकदार असे करणार नाहीत, त्यांच्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीवर रोख लावली जाईल, या गुंतवणूकदार या घोषणांना रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट्स केफिनटेक आणि सीएएमएस या एमएस सेंट्रलच्या साईट्सवर आँनलाईन पाहता येतील.

नियम २ - पॅन आधार लिंक

३१ मार्चपूर्वी पॅन आधार लिंक केले नसेल तर पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि सर्व आर्थिक समीकरणे गडबडतील. पॅनकार्ड निष्क्रिय झाले तर त्याचा थेट परिणाम केवायसीवर पडेल. सर्व एमएफ फोलियोसाठी पॅनकार्ड आधाराशी संलग्न नसेल तर गुंतवणूक १ एप्रिलपासून प्रभावित होईल.

नियम ३ -

सेबीने गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांना नोंदणीकृत इमेल आयडी आणि ओटीपी अनिवार्य केला होता. आता एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठीही हा नियम १ एप्रिलपासून लागू करण्यात आला आहे.

नियम ४

ज्या गुंतवणूकदारांसाठी १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी केवायसीसाठी अधिकृतरित्या वॅलिड डाॅक्यूमेंट्सच्या रुपात आधाराचा उपयोग केला आहे., त्यांना केवायसी नोंदणीकृत एजन्सींना ३० एप्रिलपूर्वी ही केवायसी पुन्हा करावी लागणार आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग