मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Dividend Declared : या चार कंपन्या देणार लाभांशाचं बंपर गिफ्ट, कंपन्या कोणत्या आणि नेमकी रेकाॅर्ड डेट जाणून घ्या

Dividend Declared : या चार कंपन्या देणार लाभांशाचं बंपर गिफ्ट, कंपन्या कोणत्या आणि नेमकी रेकाॅर्ड डेट जाणून घ्या

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 16, 2023 12:46 PM IST

Divident Declared : शेअर बाजारात ४ कंपन्या एक्स डिव्हिडंन्ट स्टाॅक रुपात ट्रेड करत आहेत. या चार कंपन्यांच्या यादीत एचडीएफसी, एचडीएफसी बँकेचाही समावेश आहे.

Dividend declared HT
Dividend declared HT

Dividend Declared : लाभांश देणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांसाठी आज चांगला दिवस आहे. शेअर बाजारात आज ७ कंपन्या एक्स डिव्हिडंन्ट स्टाॅक्स रुपात ट्रेड करत आहेत. आज या कंपन्यांच्या यादीत एचडीएफसी, एचडीएफसी बँकेचाही समावेश आहे. जाणून घेऊया कोणत्या कंपन्या किती टक्के लाभांश देणार आहेत ते...

- एचडीएफसी

शेअऱ बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक शेअर्सवर कंपनी ४४ रुपयांचा लाभांश देणार आहे. योग्य गुंतवणूकदारांना लाभांश ३ जूनला दिला जाणार आहे. आज सकाळी कंपनीचे शेअर्स १.७२ टक्के घसरणीसह २७३६.१० रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते.

एचडीएफसी बँक

खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँकेने आपल्या गुंतवणूकदारांना १९ रुपयांच्या हिशोबाने लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. शेअऱ बहाजारात ही कंपनी आज एक्स डिव्हिडंन्ट म्हणून ट्रेड करत आहे. शेअर्समध्ये १ टक्का घसरणीसह १६५८ रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

जीएम ब्रीवरिज

कंपनीने प्रति शेअर्सवर ६ रुपयांचा लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीची रेकाॅर्ड डेट आज आहे. ०.२९ टक्के घटीसह स्टाॅक ५६७.५० रुपयांवर ट्रेड करत आहे. गेल्या सहा महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे.

सुंदरम फास्टनर्स

मंगळवारी सकाळी १.४१ टक्के घसरणीसह ा कंपनीचे शेअर्स १०५६ रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे. कंपनीने प्रती शेअर्स ३.०६ रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी हा लाभांश ३ जून ला देणार आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग