मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PSU bank Share : 'या' तीन सरकारी बँकांनी केलं गुंतवणूकदारांना मालामाल, तुमच्याकडं आहेत का शेअर?

PSU bank Share : 'या' तीन सरकारी बँकांनी केलं गुंतवणूकदारांना मालामाल, तुमच्याकडं आहेत का शेअर?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 19, 2024 07:03 PM IST

PSU Bank Share Price : गेल्या काही दिवसांपासून तीन सरकारी बँकांचे शेअर गुंतवणूकदारांना सुखद धक्के देत आहेत.

Share Market News
Share Market News

PSU Bank Share Price : सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांचे शेअर्स गेल्या १५ दिवसांपासून सुखद धक्के देत आहेत. इंडियन ओवरसीज बँक (IOB), पंजाब अँड सिंध बँक (Punjab and Sind Bank) आणि युको बँकेचा (UCO Bank) यात समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे तिन्ही शेअर आजही ७० रुपयांच्या खाली आहेत.

मागच्या १५ दिवसांत आयओबी बँकेचा शेअर ४३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढून ७०.१० रुपयांवर पोहोचला आहे. युको बँकेचा शेअर सध्या ६०.७० रुपयांवर आहे. या शेअरमध्ये १५ दिवसांत ४२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर पंजाब आणि सिंध बँकेनं ३७ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. सध्या हा शेअर ६७.८० रुपयांवर व्यवहार करत आहे.

एका वर्षात १७९ टक्के परतावा

आयओबीच्या शेअरचं तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण केल्यास हा शेअर दीर्घ आणि अल्प कालावधीत नेहमीच तेजीत असल्याचं दिसतं. आज, आठवड्याच्या पहिल्या दिवशी आयओबीचा शेअर एनएसईवर ३.१५ टक्क्यांनी वाढून ७०.४५ रुपयांवर पोहोचला आहे. या वर्षी आतापर्यंत तो ६१ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. गेल्या एका वर्षात या शेअरनं १७९ टक्क्यांहून अधिक परतावा देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ८३.७५ रुपये आहे तर, निचांक २०.८५ रुपये आहे.

पंजाब आणि सिंध शेअरही मजबूत

पंजाब आणि सिंध बँकेचा शेअर टेक्निकल चार्टवर तेजीत आहे. हा शेअर दीर्घ आणि अल्प मुदतीसाठी तेजीचा आहे. या वर्षी आतापर्यंत ५४ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात १५९ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत यात ८८ टक्के वाढ झाली आहे. आज हा शेअर ६७.३५ रुपयांवर बंद झाला. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ७७.५० रुपये आहे आणि निचांक २३.१० रुपये आहे.

युको बँकेच्या शेअरची घोडदौड सुरूच

युको बँकेचा शेअर देखील सध्या ७० रुपयांच्या आत आहे. आज हा शेअर किंचित वाढून ६०.७० रुपयांवर बंद झाला. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ७०.६५ रुपये आहे आणि निचांक २२.२५ रुपये आहे. गेल्या ५ दिवसांत या स्टॉकमध्ये १५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्यात यावर्षी आतापर्यंत सुमारे ५२ टक्के वाढ झाली आहे. एका वर्षात १३८ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. हा शेअर सध्या चांगलाच तेजीत असून गुंतवणूकदारांनी होल्ड करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग